zoo banned the woman after finding out that she had an affair with a chimpanzee  Dainik Gomantak
ग्लोबल

महिलेचे चिंपांझीसोबत 'अफेअर' लक्षात येताच प्राणी संग्रहालयाने घातली बंदी

प्राणी संग्रहालय (Zoo) प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात येईपर्यंत या प्रेम कहाणीला 4 वर्ष झाले होते.

दैनिक गोमन्तक

अनेकदा प्राण्यांवर प्रेम करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण मानलं जातं. मात्र जेव्हा एखाद्या महिलेने दावा केला, मात्र एखादी महिला एखाद्या माणसाच्या प्रेमात पडावी तशी एखाद्या प्राण्याच्या प्रेमात पडली, तर हा ही बाब विशेष ठरु शकते. अशीच एक घटना बेल्जियममध्ये (Belgium) घडली आहे. एका चिंपांझीच्या (chimpanzee) प्रेमात पडलेल्या एका महिलेला थेट प्राणी संग्रहायलात (Zoo) येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

एक महिला बेल्जियमच्या अँटवर्प प्राणिसंग्रहालयातील एका चिंपांझीच्या प्रेमात पडली असल्याचे लक्षात येताच, अधिकाऱ्यांनी या महिलेला प्राणिसंग्रहालयात येण्यावरच बंदी घातली आहे. ही महिला विशिष्ट चिंपांझीसोबत थोडा जास्त वेळ घालवायची. त्यानंतर महिलेने असा दावा देखील केला की, ती या चिंपांझीबरोबर खूप वेळ घालवत होती कारण तिचे त्या चिंपांझी बरोबर 'अफेअर' होते.

एडी टिमर्मन्स ही महिला दर आठवड्याला प्राणिसंग्रहालयाला भेट द्यायला जायची आणि चिता नावाच्या 38 वर्षीय चिंपांझीसोबत वेळ घालवायची. काचेच्या दोन्ही बाजुंनी ते दोघे एकमेकांचे चुंबण देखील घ्यायचे. प्राणी संग्रहालय प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात येईपर्यंत या प्रेम कहाणीला 4 वर्ष झाले होते.

"मला त्या प्राण्यावर प्रेम आहे आणि तो सुद्धा माझ्यावर प्रेम करतो. मला दुसरे काहीही नकोय, ते माझ्यापासून त्याला का दुर करता आहेत, मी सांगते आहे आमचं अफेअर आहे.” अशा भावना टिमर्मन्स यांनी व्यक्त केल्या आहे. प्राणी संग्रहालयाचे असे म्हणने आहेल की, 'प्रेम प्रकरण' चिंपांझीसाठी हानिकारक ठरत होते कारण त्याला इतर चिंपांझींशी संबंध विकसित करण्यात अडथळा येत होते.

"जेव्हा चिता सतत अभ्यागतांमध्ये व्यस्त असते, तेव्हा इतर माकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याला गटाचा भाग मानत नाहीत, जरी ते महत्त्वाचे असले तरी. नंतर तो भेटीच्या वेळेच्या बाहेर स्वतःच बसतो," प्राणीसंग्रहालयाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT