YouTube removes 10lkahs videos from its video platform Dainik Gomantak
ग्लोबल

YouTubeने हटवले जवळपास 10 लाख व्हिडिओ, काय आहे नेमके कारण

YouTube व्यासपीठ सध्या प्रत्येक तिमाहीत सुमारे 10 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकत आहेत.

दैनिक गोमन्तक

YouTubeने आपल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून (Video Platform) कोरोना (COVID-19) बाबतची चुकीची आणि धोकादायक माहिती पसरवणारे दहा लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत.

गुगलच्या (Google) मालकीच्या व्हिडीओ प्लॅटफॉर्मचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) राजकीय नेत्यांकडून टीका केली जात आहे कारण या प्लॅटफॉर्मवरून व्हायरस आणि इतर विषयांबद्दल चुकीची आणि हानिकारक माहिती आणि पसरवणे थांबवण्यात हे सारे प्लॅटफॉर्म अपयशी ठरले आहेत. (YouTube removes 10lkahs videos from its video platform)

यूट्यूबने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की हि कारवाई आरोग्य संस्थांच्या तज्ञांच्या सल्ल्यावर आधारित असून ज्यात यूएस रोग नियंत्रण केंद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेचा समावेश आहे.

YouTube चे मुख्य उत्पादन अधिकारी नील मोहन यांनी याबाबत बोलताना आमची धोरणे वास्तविक व्हिडिओला थेट गंभीर नुकसान पोहोचवणारे कोणतेही व्हिडिओ काढून टाकण्यावर केंद्रित आहेत. तसेच फेब्रुवारी 2020 पासून धोकादायक कोरोनाव्हायरस माहितीशी संबंधित दहा लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत, ज्यात उपचारांचे खोटे दावे केले गेले आहेत असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिली आहे.

यूट्यूबने सांगितले की कंपनी चुकीची माहिती देणारे व्हिडिओ काढून टाकण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी वेगाने काम करत आहे. तसेच हे व्यासपीठ सध्या प्रत्येक तिमाहीत सुमारे 10 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकत आहेत. यूट्यूबने असेही म्हटले आहे की नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून निवडणूक चुकीच्या माहिती धोरणांचे उल्लंघन करणारे "हजारो" व्हिडिओ काढून टाकण्यात आले होते, यापैकी अनेक व्हिडिओ 100 व्हिव्हिज पूर्वीच काढून टाकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT