india -bangladesh border Dainik Gomantak
ग्लोबल

लग्नासाठी तरुणाने ओलांडली आंतरराष्ट्रीय सीमा!

नवविवाहित जोडप्याला सीमा सुरक्षा दलाने अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील जयकान्तो चंद्र राय (Jayakanto Chandra Rai) या तरुणाने सोशल मिडियावरुन (Social media) एका बांग्लादेशी तरुणीच्या प्रेमात पडला.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून बांग्लादेशी (Bangladeshi) घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापत आहे. याच मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस (Trinamool Congress) समोरासमोर आले होते. त्यात आता दोनच दिवसांपूर्वी बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना (Rohingya citizens) हाकलून लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. ही सर्व पार्श्वभूमी असताना बांग्लादेशमध्ये जाऊन लग्न करणं एका भारतीयाला चांगलंच महागात पडलं आहे.

नवविवाहित जोडप्याला सीमा सुरक्षा दलाने अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील जयकान्तो चंद्र राय (Jayakanto Chandra Rai) या तरुणाने सोशल मिडियावरुन (Social media) एका बांग्लादेशी तरुणीच्या प्रेमात पडला. त्यानंतर एक महिनाभर या जोडप्यांचे हाय हॅलो चाललं. दोघांचे विचार एकमेकांशी जुळल्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाच्या आणाभाका या दोघांनी घेतल्या आणि लग्न करण्याचं अखेर ठरवलं.

पश्चिम बंगालमधील बल्लारपूर (Ballarpur) गावातील हा तरुण आहे. तरुणी बांग्लादेशमधील नेराळी गावाची रहिवासी आहे. या दोघांचं सुत पहिल्यांदा फेसबुकवरुन (Facebook) जुळलं. त्यानंतर जयकान्तो ने 8 मार्चला सीमा ओलांडून बांग्लादेशमध्ये गेला. त्याला बांग्लादेशला जाण्यासाठी त्याने एका दलालाची मदत घेतली. तो 25 जूनपर्यंत बांग्लादेशमध्ये राहिला. त्यानंतर दोघांनी भारतामध्ये येण्यासाठी बांग्लादेशमधील एका दलालाची मदत घेतली. आणि त्याला 10 हजार बांग्लादेशी टाका या दलालाला दिले. त्याच्या मदतीने ते भारताच्या सीमेत घुसले.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना बेकायदेशीररित्या मधुपुर (Madhupur) येथे काही जण घुसले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना ताब्यात घेतले. चौकशी अंती त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.

पुढील कारवाईसाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या दोन जोडप्यांना भीमपूर पोलिसांच्या (Bhimpur Police) स्वाधिन केले आहे. आता भीवपूर पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. बांग्लादेशमधून येण्यासाठी कोण कोणत्या लोकांनी त्यांना मदत केली त्याचाही शोध घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT