Yemen Saudi Arabia Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Yemen Houthi Missile Attack Saudi Arabia: यमन सैन्य आणि हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दक्षिण भागावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा भीषण मारा करत पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पाडली.

Manish Jadhav

Yemen Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर यमन सैन्य आणि हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दक्षिण भागावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा भीषण मारा करत पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पाडली. सौदी अरेबियाची नामांकित आणि सर्वात महत्त्वाची सरकारी तेल कंपनी 'सऊदी अरामको'ची जिजान रिफायनरी, महत्त्वाचे लष्करी हवाई अड्डे आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले. या महाकाय हल्ल्यानंतर जिजान रिफायनरीतून काळ्या धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत असून, रोज तब्बल 4 लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या या केंद्राला बसलेला फटका सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.

हूती बंडखोरांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने (Saudi Arabia) गेल्या तीन दिवसांत यमनवर केलेल्या 121 हवाई हल्ल्यांचा हा थेट आणि कडक प्रत्युत्तर म्हणून केलेला प्रतिहल्ला आहे. सौदीने यमनमधील एका तुरुंगावर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्याचा बदला म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली. आभा विमानतळ, किंग खालिद एअरबेस आणि जिजान, नजरान, खमीस मुशायत यांसारख्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यात आला. यामुळे सौदीच्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असलेल्या तेल संपत्तीवर आणि लष्करी तळांवर थेट हल्ला चढवून यमनी सैन्याने सौदी अरेबियाच्या सर्वात संवेदनशील आणि नाजूक नस पकडली.

दुसऱ्या बाजूला, सौदी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, हूतींनी निवासी भाग आणि व्यावसायिक केंद्रांवर हल्ला करुन देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचे म्हटले. सौदी अरेबिया आता गप्प बसणार नसून योग्य ती कठोर लष्करी कारवाई केली जाईल, असा कडक इशारा देण्यात आला. यमनमधील सत्तासंघर्ष, प्रादेशिक वर्चस्व आणि सीमा सुरक्षेच्या प्रदीर्घ वादामुळे हा भडका उडाला आहे.

या भीषण हल्ल्यामुळे सौदी सरकारला हादरा बसला असून महिनाभरापूर्वीच 7 ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या ऐतिहासिक 'मक्का करारा'ची ही पहिली मोठी परीक्षा ठरणार आहे. या तीन देशांपैकी एकावरही हल्ला झाल्यास तो तिघांवर हल्ला मानला जाईल, असा करार मक्का येथे करण्यात आला होता. आता यमनची क्षेपणास्त्रे थेट सौदीच्या भूमीवर कोसळल्याने इस्लामाबाद आणि अंकारा प्रत्यक्ष युद्धभूमीवर सौदीच्या मदतीला उतरतात की केवळ कागदी विधानांपुरते मर्यादित राहतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT