Yemen New PM Ahmed Awad Bin Mubarak Dainik Gomantak
ग्लोबल

कोण आहेत येमेनचे नवे PM अहमद अवद बिन मुबारक? सत्ताबदलाचा भारतासोबतच्या संबंधांवर होणार परिणाम

Yemen New PM Ahmed Awad Bin Mubarak: येमेनमध्ये दशकभर चाललेल्या गृहयुद्धादरम्यान येथे सत्तापरिवर्तन झाले आहे.

Manish Jadhav

Yemen New PM Ahmed Awad Bin Mubarak: येमेनमध्ये दशकभर चाललेल्या गृहयुद्धादरम्यान येथे सत्तापरिवर्तन झाले आहे. देशाच्या प्रेसिडेंशियल कॉन्सिलने परराष्ट्र मंत्री अहमद अवाद बिन मुबारक यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. तर पंतप्रधान मेन अब्दुल मलिक सईद यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रेसिडेंशियल कॉन्सिलने जारी केलेल्या आदेशानुसार ते आता प्रेसिडेंशियल लीडरशिप कॉन्सिलच्या अध्यक्षांचे सल्लागार म्हणून देशाची सेवा करतील.

अहमद अवाद बिन मुबारक हे सौदी अरेबियाचे जवळचे मानले जातात

सध्या, प्रेसिडेंशियल कॉन्सिलने या संपूर्ण उलथापालथीच्या कारणांबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही. त्याचबरोबर येमेनमध्ये नवा पंतप्रधान निवडताच सत्ता समीकरण आणि गृहयुद्धातून नवे अर्थ काढले जात आहेत.

खरे तर, आतापर्यंत परराष्ट्र मंत्री असलेले अहमद अवाद बिन मुबारक हे सौदी अरेबियाचे जवळचे मानले जातात. अलीकडेच येमेनमध्ये (Yemen) सुरु असलेल्या संघर्षात सहभागी हुथी आणि सौदी अरेबिया यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे शांततेची काही सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत. आता या सत्तापरिवर्तनामुळे प्रेसिडेंशियल कॉन्सिलचे हे पाऊल युद्ध संपवण्यासाठी ठोस कारण ठरु शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

भारतासोबतचे संबंध सुधारतील, 1962 पासूनची मैत्री

अहमद अवाद बिन मुबारक येमेनचे नवे पंतप्रधान बनल्याने भारतासोबत येमेनचे संबंध सुधारतील. बिन मुबारक हे सौदी अरेबियाच्या जवळचे आहेत आणि सौदी अरेबिया आणि येमेन या दोन्ही देशांशी भारताचे (India) संबंध पूर्वीपासून चांगले आहेत. खरे तर, येमेन आणि भारत या दोन्ही देशांचे प्रतिनिधी पुरोगामी विचाराचे आहेत.

परराष्ट्र मंत्री असताना अहमद अवाद बिन मुबारक यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला पाठिंबा दिल्याचे अनेक प्रसंग आहेत. त्याचबरोबर भारताने येमेनला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली होती हेही इतिहासातून जाणून घेणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर 1962 मध्ये येमेन अरब रिपब्लिक पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर 1967 मध्ये येमेन डेमोक्रॅटिक रिपब्लिकची स्थापना झाली तेव्हा भारत त्यांना मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक होता.

येमेनमध्ये 10 वर्षांपासून गृहयुद्ध सुरु आहे

मिळालेल्या माहितीनुसार, येमेनमध्ये 2014 पासून गृहयुद्ध सुरु आहे. सध्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी हुथी बंडखोरांना लक्ष्य करत आहे. हुथींना इराणचा पाठिंबा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येमेनमध्ये गृहयुद्धामुळे आतापर्यंत एकूण 1.50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सामान्य लोकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या येमेनची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. सौदी अरेबिया, भारत आणि इतर देशांच्या मदतीने त्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT