Yemen: येमेनमध्ये मृत्युदंड मिळालेली कोण आहे भारतीय नर्स? समजून घ्या संपूर्ण प्रकरण

Yemen Court: येमेन न्यायालयाने भारतीय महिला निमिषाला हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.
Indian Nurse Nimisha Priya
Indian Nurse Nimisha PriyaDainik Gomantak

Indian Nurse Nimisha Priya: कतारमध्ये आठ भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयादरम्यान येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशी दिल्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येमेन न्यायालयाने भारतीय महिला निमिषाला हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.

याप्रकरणी आरोपी नर्सच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन येमेनला जाण्याची विनंती केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे.

दरम्यान, निमिषा प्रियाच्या आईच्या विनंतीवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला निर्णय घेण्यास सांगितले. वास्तविक, निमिषाच्या आईला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी येमेनला जायचे आहे, जेणेकरुन ती पीडितेच्या कुटुंबियांसोबत नुकसानभरपाईसंबंधी चर्चा करु शकेल. याआधी 13 नोव्हेंबरला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निमिषाची फाशीच्या शिक्षेविरुद्धची याचिका फेटाळली होती.

Indian Nurse Nimisha Priya
Stampede in Yemen: यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्य

मुलीला वाचवण्यासाठी आईची विनवणी

आपल्या मुलीला वाचवण्यासाठी निमिषाच्या आईला येमेनला जायचे असून महदीच्या कुटुंबाला तिच्या मुलीला माफ करण्याचे आवाहन करायचे आहे. तिला महदीच्या मृत्यूच्या बदल्यात त्याच्या कुटुंबाला ब्लड मनी देण्यावरही बोलणी करायची आहे. सध्या आपल्या मुलीला वाचवण्याचा हा एकच मार्ग असल्याचे त्या सांगतात.

याचिकाकर्त्याचे वकील सुभाष चंद्रन केआर म्हणाले की, निमिषाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पीडितेच्या कुटुंबाशी बोलणे आणि समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणे. यासाठी याचिकाकर्त्याला येमेनला जाण्याची गरज असली तरी, येमेनला (Yemen) जाण्यावर बंदी असल्याने निमिषाची आई येमेनला जाऊ शकत नाही.

Indian Nurse Nimisha Priya
Yemen Houthis दहशतवादी हल्ल्यातबाबत UAEने केले पहिले विधान

काय आहे प्रकरण?

निमिषा 2017 पासून येमेनमधील तुरुंगात आहे. येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी निमिषा दोषी आढळली होती. पासपोर्ट मिळवण्यासाठी महदीला बेशुद्धीची इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्यावर होता, मात्र या इंजेक्शनमुळेच महदीचा मृत्यू झाला. केरळमधील पलक्कड येथे राहणारी नर्स निमिषा गेल्या दशकापासून पती आणि मुलीसोबत येमेनमध्ये काम करत होती.

2016 मध्ये येमेनमधील गृहयुद्धामुळे देशाबाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली. पण त्याआधी 2014 मध्ये तिचा नवरा आणि मुलगी भारतात परतले होते. पण निमिषा परत येऊ शकली नाही. यानंतर निमिषावर जुलै 2017 मध्ये येमेनी नागरिकाच्या हत्येचा आरोप करण्यात आला.

त्यामुळे 7 मार्च 2018 रोजी येमेन येथील न्यायालयाने निमिषाची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत महदीने निमिषाचा शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com