Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

शी जिनपिंग तिसऱ्यांदा काबीज करणार चीनची सत्ता, तयारी झाली सुरु

चीनच्या (China) सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसर्‍या टर्मसाठी मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसर्‍या टर्मसाठी मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही महिन्यांत होणाऱ्या पक्षाच्या (Communist Party of China) निवडणुकीतून प्रतिनिधींची निवड केली जाईल. त्यानंतर एकमताने प्रतिनीधी शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. पक्ष काँग्रेसची पाच वर्षांतून एकदा बैठक होते. 68 वर्षीय शी जिनपिंग यांची शुक्रवारी पक्षाच्या गुआंगशी प्रादेशिक काँग्रेसमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. शिन्हुआच्या वृत्तानुसार सांगण्यात आले आहे. (Xi Jinping will seize power in China for the third time)

दरम्यान, 20 व्या सीपीसी राष्ट्रीय काँग्रेसच्या (Congress) प्रतिनिधीसाठी सीपीसी केंद्रीय समितीने शी यांना उमेदवारी दिली आहे, असे वृत्तात म्हटले आहे. ही काँग्रेस 2022 च्या उत्तरार्धात होणार आहे. गुआंगशी झुआंग स्वायत्त प्रदेशाची सीपीसी काँग्रेसची बैठक राजधानी नॅनिंगमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. नोव्‍हेंबरमध्‍ये होणार्‍या कॉंग्रेसच्या बैठकीची वेळ साहजिकच देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या जटील आणि अस्थिर राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलण्‍यात आली.

सैन्य आणि सत्तेवर पकड मजबूत केली

यासोबतच रशिया (Russia) -युक्रेन युद्धाचा परिणाम देखील चीनवर झाला आहे. रशिया-चीनच्या मैत्रीला ब्रेक लावण्यासाठी आमेरिका निर्बंधाचं हत्यार उगारत आहे. शी यांनी 2012 च्या उत्तरार्धात अशाच एका CPC कॉंग्रेसमध्ये पहिल्या निवडणुकीपासून पक्षाचे नेतृत्व केले. शक्तिशाली सैन्य आणि अध्यक्षपदासह सत्तेवर त्यांची पकड मजबूत केली आहे. शी यांनी अनेक मुद्द्यांवर देशाविरुद्ध निर्माण होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संकटांचा सामना करताना पक्ष आणि देशाच्या स्थिरतेसाठी मजबूत नेतृत्वाची गरज अधोरेखित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT