China President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

Xi Jinping: चीनमध्ये पुन्हा शी जिनपिंग, तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान

शी जिनपिंग यांची पुन्हा एकदा चीनच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Xi Jinping China President: चीनमध्ये पुन्हा एकदा शी जिनपिंग यांची राष्ट्रपतीं पदासाठी निवड झाली आहे. त्यांनी सलग तिसऱ्यांदा ही जबाबदारी स्वीकारली आहे. शुक्रवारी शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतली आहेत.

यासोबतचे शी जिनपिंग चीनमध्ये सर्वाधिक काळ सेवा देणारे राष्ट्रपती ठरले आहेत. नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) पक्षाच्या 14 व्या बैठकीत शी जिनपिंग यांना तिसर्‍यांदा राष्ट्रपती बनण्यावर शिक्कामोर्तब झाला.

तिसऱ्यांचा राष्ट्रपती बनल्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढणार आहे. जिनपिंग यांनी चीन सरकार आणि अर्थव्यवस्थेवर आपली पकड आणखी मजबूत केली आहे.

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसची (CCP) वार्षिक बैठक रविवारी (5 मार्च) रोजी सुरू झाली. या बैठकीमध्ये नव्या राष्ट्रपतीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होता. नॅशनल पीपल्स काँग्रेसची बैठक आठवडाभर सुरू होती.

त्यानंतर 10 मार्च रोजी जिनपिंग यांच्या नावावर सर्वांचं एकमत झाले. पण या बैठकीत शी जिनपिंग यांना काही आव्हानांचाही सामना करावा लागला. त्यांच्या झिरो-कोविड धोरणाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण या सर्व आव्हानांवर त्यांनी मात केल्याने त्यांची पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. 

  • चीन लष्करावर 18 लाख कोटी खर्च करणार

जिनपिंग यांचा तिसरा कार्यकाळ अशा वेळी सुरू होतो, जेव्हा जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था संथ गतीने वाढत आहे. पण या बैठकीत चीन 2023 मध्ये 18 लाख कोटी रुपये संरक्षणावर खर्च करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा 3 पट जास्त आहे. त्याचबरोबर 2023 साठी चीनच्या आर्थिक विकासाचे लक्ष्य 5 टक्के ठेवण्यात आले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT