Shark Dainik Gomantak
ग्लोबल

शार्कने 4 दिवसांत घेतला होता 150 अमेरिकन सैनिकांचा बळी!

आतापर्यंतचा सर्वात मोठा शार्क हल्ला मानला जात आहे. या घटनेपासून प्रेरित होऊन जॉज हा चित्रपट तयार करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

शार्क किती धोकादायक असतात हे सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु यापैकी फारच कमी लोकांना माहित आहे की शार्कशी प्रत्यक्ष सामना झाल्यावर काय होते. शार्कच्या हल्ल्यात (shark attack,) जगातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, परंतु इतिहासात (The Worst Shark Attack in History) नोंदलेला सर्वात धोकादायक शार्कचा हल्ला कितीतरी लोकांच्या काळजाचा ठोका चूकविणारा आहे. ही घटना यूएस नेव्हीच्या सैनिकांसोबत घडली, ज्यामध्ये शार्कच्या हल्ल्यात सुमारे 150 सैनिकांचा मृत्यू झाला होता.

1945 मध्ये अमेरिकन जहाजावर (USS Indianapolis) जपानी पाणबुडीने हल्ला केला होता. हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. पॅसिफिक महासागरातील ग्वामजवळ हा हल्ला झाला. त्यावेळी अमेरिकन जहाजावर सुमारे 1,196 लोक होते, परंतु जपानच्या पाणबुडीचा टॉर्पेडो अमेरिकन जहाजावर आदळताच त्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासोबतच जहाजावरील 3,500 गॅलन विमान इंधनही जहाजावर सांडले, त्यामुळे उर्वरित 900 लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या.

लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या

वाचलेल्या एका व्यक्तीने पॅसिफिक महासागरात उडी मारल्याने त्यांचे जीव जळत्या जहाजातून आणि इंधनापासून वाचतील असे त्यांना वाटले होते. परंतु त्यांना कुठे माहित होते की पाण्याखालील शार्क आणि समुद्रातील पांढरे टीप शार्क त्यांची वाट पाहत आहेत. या अपघातातील शेवटचा बचावलेला एडगर हॅरेलने (Edgar Harrell) 2019 मध्ये सांगितले की हा अपघात किती भयानक होता. आता या सैनिकाचे 2021 मध्ये निधन झाले.

150 लोकांना जीव गमवावा लागला होता

सैनिकांनी पाण्यात उडी मारली तेव्हा त्यांच्या आजूबाजूला मृतदेह आणि पाण्याखाली शार्क मासे होते. पहिल्या दिवशी, शार्कने मृत शरीरांना आपले अन्न बनवले, परंतु दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जिवंत लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. एडगरने सांगितले की त्याच्या डोळ्यांसमोर, एकामागून एक, लोकं त्याला मरतांना दिसत होते. शार्क कोणाचा पाय घेत होते, कोणाचा हात घेत होते तर कुणाला या शार्कनी अनेकांना जिवंत चावले होते.

सुमारे 4 दिवस पाण्यात सैनिकांची शार्क माशांशी लढाई चालू होती. 17 लोकांनी मिळून एक बोट बनवली ज्यामध्ये एडगर देखील होता आणि कसा तरी त्यात बसून तो बेटावर आला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. एका अहवालानुसार, 1,196 पैकी केवळ 317 लोक जिवंत होते. त्यापैकी सुमारे 150 शार्क हल्ल्यात मरण पावले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शार्क हल्ला मानला जात आहे. या घटनेपासून प्रेरित होऊन जॉज हा चित्रपट तयार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT