Pollution Dainik Gomantak
ग्लोबल

जगभरात प्रदूषणामुळे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू, भारत अन् चीनमध्ये सर्वाधिक

जगभरात 2019 मध्ये, प्रदूषणामुळे (Pollution) सुमारे 9 दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

जगभरात 2019 मध्ये, प्रदूषणामुळे सुमारे 9 दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका नव्या जागतिक अहवालात ही बाब समोर आली आहे. या विषारी हवेच्या श्वासोच्छवासामुळे मृत्यूची संख्या आणि त्याची अधिकता यावर तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 2000 पासून, कार, ट्रक आणि उद्योगांमधून प्रदूषित हवेमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 55% वाढले आहे. भारत आणि चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होतात, दरवर्षी सुमारे 2.4 दशलक्ष आणि 2.2 दशलक्ष मृत्यू होतात.

भारताची आकडेवारी भीतीदायक

भारतात (India) वायू प्रदूषणाशी संबंधित 16.7 लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक - 9.8 लाख पीएम 2.5 प्रदूषणामुळे झाले. आणखी 6.1 लाख घरगुती वायू प्रदूषणामुळे झाले. अत्यंत गरिबीशी संबंधित प्रदूषित स्रोतांमुळे होणारे मृत्यू (जसे की घरातील वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण) कमी झाले असले तरी, औद्योगिक प्रदूषणामुळे (जसे की सभोवतालचे वायू प्रदूषण आणि रासायनिक प्रदूषण) मृत्यू वाढले आहेत.

वायू प्रदूषणामुळे 66.7 लाख मृत्यू

अहवालानुसार, जगभरात केवळ वायू प्रदूषणामुळे (Pollution) 66.7 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. घातक रसायनांच्या वापरामुळे 17 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. 2019 मध्ये केवळ वायुप्रदूषणामुळे भारतात 16.7 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच, हिशोब केला तर त्या वर्षी देशातील एकूण मृत्यूंपैकी 17.8% मृत्यू हे 2015 प्रमाणेच आहेत. द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलच्या एका नवीन अहवालानुसार, एकूण प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी पहिल्या 10 देशांमध्ये युनायटेड स्टेट्स (United States) हा एकमेव औद्योगिक देश आहे. 2019 मध्ये, बांग्लादेश आणि इथिओपिया दरम्यान 142,883 मृत्यूंसह प्रदूषणाच्या बाबतीत ते 7 व्या क्रमांकावर आहे.

याशिवाय, अल्जेरियाने 2021 मध्ये पेट्रोलमध्ये लीड वापरावर बंदी घातली. असे करणारा तो शेवटचा देश आहे. परंतु मुख्यतः लीड अ‍ॅसिड बॅटरी आणि ई-कचऱ्याच्या अनियंत्रित पुनर्वापरामुळे लोक घातक पदार्थाच्या संपर्कात येतात. बहुतांश गरीब देशांमध्ये अशा मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT