...म्हणून श्रीलंका सरकारने नवीन चलन छापण्याचा निर्णय घेतला

श्रीलंका विदेशी कर्ज फेडू शकला नाही, त्यामुळे देश दिवाळखोरीच्या दिशेने जात आहे: पंतप्रधान विक्रमसिंघे
Prime Minister Ranil Wickremesinghe
Prime Minister Ranil WickremesingheDainik Gomantak
Published on
Updated on

आर्थिक संकटाने वेढलेल्या श्रीलंकेच्या नव्या सरकारने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन उपाय योजना आखल्या आहेत. (Sri Lankan government to print currency in order to pay salaries)

Prime Minister Ranil Wickremesinghe
Petrol Price: महाग पेट्रोलच्या बाबतीत भारत जगात 42 व्या क्रमांकावर

सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे सरकारने नवीन चलन छापण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच राष्ट्रीय एअरलाईन विकण्याचे सरकारने ठरवले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे सोमवारी राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले की, नवीन सरकारची श्रीलंकन एअरलाइन्सचे खाजगीकरण करण्याची योजना आहे. त्यांनी सांगितले की मार्च 2021 मध्ये श्रीलंकन ​​एअरलाइन्सला 45 अब्ज रुपयांचा तोटा झाला.

Prime Minister Ranil Wickremesinghe
OMG: अंगावरील 'तिळा' ने वाचवले लोकप्रिय मॉडेलचे प्राण! वाचा संपूर्ण कहाणी

विक्रमसिंघे म्हणाले, या तोट्याचा भार ज्यांनी कधी विमानात पायही ठेवला नाही अशा गरिबांनी उचलावा लागू नये. सरकारी कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी नवीन चलन छापण्याची सक्ती केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाकडे फक्त एक दिवसाचा पेट्रोलचा साठा शिल्लक आहे आणि सरकार श्रीलंकेच्या सागरी सीमेवर उभ्या असलेल्या तीन कच्च्या तेलाच्या जहाजांचे पैसे देण्यासाठी खुल्या बाजारातून डॉलर्स उभारण्याची अपेक्षा करत आहे.

ते म्हणाले, पुढील काही महिने आमच्यासाठी खूप कठीण जाणार आहेत. आपल्याला ताबडतोब राष्ट्रीय असेंब्ली किंवा राजकीय मंडळ स्थापन करावे लागेल ज्यामध्ये सध्याचे संकट सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी भाग घेतला पाहिजे. श्रीलंका विदेशी कर्ज फेडू शकला नाही, त्यामुळे देश दिवाळखोरीच्या दिशेने जात आहे. येत्या काही दिवसांत देशाला 75 दशलक्ष डॉलर्सची गरज असल्याचे विक्रमसिंघे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com