World’s Largest Underground City Dainik Gomantak
ग्लोबल

World’s Largest Underground City: जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर सापडले, 1000 वर्षे जुन्या शहराची कहाणी वाचून तुम्हीही म्हणाल...

Underground City: तुर्कस्तानमध्ये नुकत्याच सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या आणि भूमिगत शहराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Manish Jadhav

Story Behind the Underground Cities in Turkey: तुम्ही जगातील सर्वात जुनी शहरे किंवा हाय-टेक शहरांबद्दल वाचले असेल, परंतु तुर्कस्तानमध्ये नुकत्याच सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या आणि भूमिगत शहराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हे इतके मोठे आणि आनंदी शहर होते, जिथे सुमारे 20 हजार लोक अगदी आरामात एकत्र राहत होते. या शतकानुशतके जुन्या भूमिगत शहरामध्ये 200 हून अधिक शहरे जमिनीखाली गाडल्याचे सांगितले जात आहे.

शहर

'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तुर्कीतील (Turkey) कॅपाडोशियामध्ये डेरिनकुयु नावाचा सुरुंग सापडला आहे. ज्यामध्ये हे संपूर्ण शहर सामावलेले होते. 11 स्तरांमध्ये बांधलेल्या या सुरुंगाचे 600 प्रवेशद्वार आहेत. या भूमिगत शहरात लोकांची आलिशान घरे, सामुदायिक इमारती, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, चर्च आणि अगदी स्मशानभूमीही आहे.

इथे अनेक उंच इमारती होत्या. प्रवेशद्वारावर दगडी दरवाजे होते, जे दीड मीटर लांब आणि 200 ते 500 किलो वजनाचे होते. त्या काळातील वास्तुकला पाहण्यासारखी आहे. या शहराची रचना आजही लोकांना आश्चर्यचकित करते.

शहराची रंजक कहाणी

या भूमिगत शहराच्या उत्खननाची कहाणीही खूप रंजक आहे. 1963 मध्ये पहिल्यांदा लोकांना या शहराची माहिती झाली होती. एका श्रीमंत व्यक्तीच्या कोंबड्या अचानक गायब होऊ लागल्या. मग त्याने रात्रभर जागून निगराणी केली, तेव्हा त्याला त्याच्या घरात बांधलेल्या तळघरात काही भेगा दिसल्या. ज्यामध्ये एक छिद्र होते आणि ते सुरुंगासारखे दिसत होते.

यानंतर त्या व्यक्तीने भिंत तोडली, त्यानंतर जे त्याला दिसले ते आश्चर्यकारक होते. पहिल्यांदा एक मोठा सुरुंग दिसला. पुढील खोदकाम पुरातत्वशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आले. त्यामध्ये असे आढळून आले की, येथे 500 हून अधिक सुरुंग आहेत.

त्या सुरुंगामध्ये भूमिगत घरे, रेशन गोदामे, शाळा, वायनरी, चर्च यांसारख्या गोष्टीही होत्या. हे संशोधन कार्य सुमारे 20 वर्षे चालले आणि त्यानंतर 1985 मध्ये डेरिनकुयुचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला.

दुसरीकडे, असे म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी येथे अतिशय शांतताप्रिय लोक राहत होते. जेव्हा तुर्क ऑटोमन साम्राज्याच्या जुलमी शासकांनी आजूबाजूच्या प्रदेशांवर हल्ला केला, तेव्हा जीव वाचवण्यासाठी त्या काळातील लोकांनी हे तथाकथित भूमिगत शहर बांधले आणि वसवले.

तथापि, हे शहर कधी बांधले गेले, त्याच्या बांधकाम कालावधीबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. तरीही हजार वर्षे जुने शहर असल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT