Highest altitude ATM Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: जगातील सर्वात उंच एटीएम, कधीच पैशाची कमतरता भासत नाही; जाणून घ्या

Highest altitude ATM: कॅश मशीन पाकिस्तान आणि चीन यांच्यातील उत्तर पाकिस्तानमधील खुंजेरब खिंडीत 4693 मीटर (15,396 फूट) उंचीवर आहे. हे सौर उर्जा आणि एअर टर्बाइनद्वारे चालवले जाते.

Manish Jadhav

Highest Altitude ATM: भारतातील सर्वात उंच एटीएमबद्दल बोलायचे झाल्यास ते सिक्कीममध्ये आहे. पण तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात उंच एटीएम कुठे आहे? याचे उत्तर पाकिस्तान आहे. भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमधील कॅश मशीन पाकिस्तान आणि चीन यांच्यातील उत्तर पाकिस्तानमधील खुंजेरब खिंडीत 4693 मीटर (15,396 फूट) उंचीवर आहे. हे सौर उर्जा आणि एअर टर्बाइनद्वारे चालवले जाते.

दरम्यान, 2016 मध्ये नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानने हे (NBP) बांधले होते. हे उभारण्यासाठी चार महिने लागले. सौर आणि पवन ऊर्जेवर चालणारे हे मशीन रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना (Employees) मदत करते. याशिवाय, जगभरातील साहसी प्रवासी या एटीएमला भेट देऊन व्यवहार करताना फोटो काढतात.

ATM चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CEPEC) वर रणनीतिकदृष्ट्या स्थित आहे. हे चोवीस तास कार्यरत असते आणि हिवाळ्याच्या काळात विशेष लक्ष वेधून घेते. एटीएमची देखभाल आणि देखरेख सोस्ट सिटीमध्ये असलेल्या दुसऱ्या शाखेद्वारे केली जाते.

बँकेच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रोख रकमेची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मशीनची जवळच्या शाखेत देखभाल केली जाते.

यामध्ये, एटीएममधून पैसे काढणे, बिलांचे डिजिटल पेमेंट आणि फंड ट्रान्सफर यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. एटीएमला हिवाळ्यात जेव्हा तापमान शून्य अंशापेक्षा कमी होते, तेव्हा अखंड सेवांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 दिवसांत सुमारे 40 ते 50 लाख रुपये काढले जातात. जास्त दाब आणि उंची असूनही, लोक आणि प्रवासी विशेषतः पैसे काढण्यासाठी या एटीएममध्ये येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT