Pakistan Economic Crisis: रशियाने दाखवला पाकिस्तानवर अविश्वास; कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ठेवली अट

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान जगभरातील विविध देशांकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Vladimir Putin
Vladimir Putin Dainik Gomantak

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आर्थिक संकटामुळे पाकिस्तानमध्ये महागाईनेदेखील उच्चांक गाठला आहे. ऊर्जाक्षेत्रातदेखील कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे तुटवडा निर्माण झाला आहे.

पाकिस्तान जगभरातील विविध देशांकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता रशियाने पाकिस्तानला कच्चे तेल देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र असे म्हटले जात आहे की रशिया आणि पाकिस्तानमध्ये विश्वासाची कमी असल्याने रशियाने पाकिस्तानला आधी 1 कार्गो कच्चे तेल आयात करण्यासाठी सांगितले आहे.

रशियाच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी पाकिस्तानकडे योग्य तंत्रज्ञान नसल्याने पाकिस्तान किती तेल खरेदी करेल यावर रशियाला शंका आहे. तेल खरेदीविषयी पाकिस्तान आणि रशियामध्ये बैठका पार पडल्या असून दोन्ही देशांकडून सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु झाल्यानंतर रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी युरोपीय देश आणि अमेरिका रशियावर विविध मार्गांनी दबाव आणत होते. याचाच एक भाग म्हणून या देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध घातले होते.

रशियाने या निर्बंधानंतर आपल्या देशातील कच्चे तेल स्वस्त दराने विकण्यास सुरुवात केली होती. परिणामस्वरुप भारत आणि रशियातील कच्च्या तेलाच्या व्यापाराने एक नवीन रेकॉर्ड तयार केले आहे.

Vladimir Putin
Japan Population:...तर जपानचे अस्तित्व संपुष्टात येईल, घटत्या जन्मदराने देशात घबराट!

पाकिस्तान( Pakistan )मध्ये परकीय गंगाजळीचादेखील तुटवडा निर्माण झाला आहे. याआधी रशिया आणि पाकिस्तानमध्ये कच्च्या तेलाच्या व्यापारासंबंधी बैठका पार पडल्या होत्या मात्र डॉलरच्या कमतरतेमुळे या व्यवहारास गती मिळाली नव्हती.

आता पाकिस्तान रशियाबरोबर तीन विविध चलनामध्ये व्यापार करु शकणार आहे. रशियाचा रुबल, चीनचा येन आणि संयुक्त अरब अमीरातच्या दिरहम चलनाचा वापर केला जाणार आहे.

रशिया- पाकिस्तानमधील हा व्यवहार पूर्ण होणार का ? पाकिस्तान रशियाचा ( Russia ) विश्वास संपादन करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com