World's First Saliva Pregnancy Test  Dainik Gomantak
ग्लोबल

Saliva Pregnancy Test: आता लाळेच्या चाचणीतून कळेल 'गुड न्यूज'! केवळ 3 मिनिटांत मिळणार रिझल्ट

Akshay Nirmale

Worlds first Saliva Pregnancy Test: लाळेच्या चाचणीतून आता महिला गर्भवती आहे की नाही, हे कळणार आहे. विज्ञानाने हा चमत्कार घडवला असून तशा पद्धतीचे नवे उत्पादन विकसित केले गेले आहे. जगात प्रथमच युनायटेड किंग्डम येथे अशा प्रकारची चाचणी करण्यात आली आहे.

यापुर्वी युरिन टेस्टमधून महिलांना ही 'गुड न्यूज' कळत होती, आता मात्र लाळेच्या चाचणीतूनही ती कळू शकणार आहे.

हे विशेष प्रेग्नेंसी किट यूके आणि आयर्लंडच्या बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हे किट इस्रायलमधील सॅलिग्नॉस्टिक या बायोटेक कंपनीने तयार केले आहे. सॅलिस्टिक असे या उत्पादनाचे नाव आहे.

गेल्या वर्षी या विशेष प्रेग्नेंसी किटची 300 महिलांवर यशस्वी चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये गर्भवती आणि सामान्य महिला अशा दोन्हींचा समावेश होता.

सॅलिस्टिक या उत्पादनामुळे स्त्रियांना पारंपरिक युरिन टेस्टवर आधारीत गर्भधारणा चाचणीसाठी एक नवा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.

सॅलिस्टिक नावाची ही गर्भधारणा किट तयार करणारी कंपनी यापूर्वी कोविड-19 चाचणी किट बनवत होती. कंपनीने म्हटले आहे की, हे नवे किटदेखील कोविड चाचणी किट बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

कंपनीच्या आरोन पालमन यांनी सांगितले की, मानवी लाळेच्या माध्यमातून अनेक आजार कमी वेळात ओळखले जाऊ शकतात. रोग, विषाणू आणि संप्रेरकांची चाचणी करण्याचा हा सर्वात सोपा आणि स्वच्छ मार्ग आहे. या नवीन उत्पादनामुळे गर्भधारणा चाचणीसाठी रक्त आणि लघवीची गरज नाहीशी होईल.

नवीन गर्भधारणा किट वापरणे खूप सोपे आहे. चाचणीसाठी, महिलेला किटची काठी तिच्या तोंडात काही सेकंद ठेवावी लागते, जेणेकरून महिलेची थुंकी किंवा लाळ त्यावर येते.

ही काठी नंतर ती प्लास्टिकच्या नळीत स्थानांतरित करेल, जिथे जैवरासायनिक प्रतिक्रिया घडते. यानंतर महिला गर्भवती आहे की नाही, याचा निकाल जास्तीत जास्त १५ मिनिटांत उपलब्ध होईल.

कंपनीचा दावा आहे की सुरुवातीची चिन्हे 3 मिनिटांतच दिसून येतात. ही नवीन चाचणी एचसीजी शोधते. हे विशिष्ट संप्रेरक भ्रुणाच्या विकासासाठी गर्भाशय तयार करण्यास मदत करते. सेलनॉस्टिक अत्यंत अचूक गर्भधारणा लवकरात लवकर ओळखते, असा कंपनीचा दावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT