Porn and Male Eating Disorders: पुरुषांमधील खाण्याचे विकार आणि पॉर्नचा संबंध काय? अतिप्रमाणात पॉर्न पाहत असाल तर हे एकदा वाचा

Porn and Male Eating Disorders: पुरुषांमधील या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा सांस्कृतिक रूढींमुळे त्यांना कलंकित केले जाते.
Porn and Male Eating Disorders
Porn and Male Eating Disorders

Porn and Male Eating Disorders:

पॉर्न पाहण्याशी संबंधित झालेल्या एका अभ्यासानुसार पुरुषांमध्ये खाण्याच्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. जर्नल बॉडी इमेजमध्ये प्रकाशित झालेला एक नवीन पेपर 'समस्याग्रस्त' पुरुषांमधील पॉर्नचा वाढता वापर आणि खाण्याच्या विकाराची लक्षणे यांच्यातील लिंक हायलाइट करतो.

इस्रायली शिक्षणतज्ञ अटेरेट गेविर्ट्झ-मेयदान आणि झोहर स्पिवाक-लावी यांनी केलेल्या अभ्यासानुसार, एखाद्या पुरुषाचा पॉर्नशी जितका जास्त संबंध असेल, तो पुरुष तितका जास्त समस्याप्रधान असेल आणि यातूनच तो खाण्याच्या विकारांचा शिकार ठरेल.

आयुष्यावर नकारात्मक परिणाम

गेविर्ट्ज-मेयदान यांनी सांगितले की, समस्याग्रस्त पुरुषांकडून पोर्नोग्राफीचा वापर जसा जसा वाढत जातो त्याचा एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीवर, नातेसंबंधांवर किंवा दैनंदिन कामकाजावर नकारात्मक परिणाम होतो. ते म्हणाले की, याकडे 'इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर'चा एक भाग म्हणून पाहिले जाते.

अमेरिकेत मोठी समस्या

अलीकडे, समस्याग्रस्त पोर्नोग्राफी आणि खाण्याच्या विकारांमधील संबंध शोधणारे अनेक पेपर स्त्रियांवर केंद्रित आहेत. मात्र, हा शोधनिबंध असा होता की ज्यामध्ये पुरुषांवर जास्त लक्ष केंद्रित केले होते.

या अभ्यासातून असेही लक्षात आले की यूएसमधील तरुण पुरुषांमध्ये खाण्याचे विकार आणि शरीरातील अपचन या दोन्ही गोष्टी वाढत आहेत, ज्यात पॉर्न पाहणाऱ्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे.

Porn and Male Eating Disorders
PM Modi In USA: PM मोदींचे ग्रँड वेलकम, न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर FIA ने फडकवला 250 फूट लांब बॅनर, पाहा Video

पुरुषांच्या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष

डॉ. गेविर्ट्झ-मेयदान यांचा असे वाटते की, पुरुषांमधील या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा सांस्कृतिक रूढींमुळे त्यांना कलंकित केले जाते. तसेच त्यांच्या शरीराची प्रतिमेची चिंता किंवा मानसिक आरोग्य याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही.

'प्रमाणाबाहेर पॉर्न पाहाणे आणि बॉडी डिसमॉर्फिया' याचा अभ्यास करणारे डॉ. कार्लोस चिक्लाना, म्हणाले की अंदाजे 6% पॉर्न दर्शक असे सांगतात की त्यांना पॉर्न पाहाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या समस्यांमधूनच विविध मानसिक विकारांना चालना मिळते.

Porn and Male Eating Disorders
PM Modi-Musk Meeting: 'मी मोदींचा फॅन, भारताच्या भविष्याबद्दल...', पंतप्रधानांच्या भेटीनंतर मस्क म्हणाले; पाहा व्हिडिओ

आत्महत्येचा धोका

अभ्यासात असे दिसून आले आहे की खाण्याचे विकार नसलेल्या लोकांपेक्षा खाण्याचे विकार असलेले लोक स्वतःला इतरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. बॉडी डिसमॉर्फियाने ग्रस्त असलेल्यांसाठीही असेच आहे.

आत्महत्येचे विचार आणि आत्महत्येचे प्रयत्न करण्याची प्रवृत्ती शरीरात अस्वस्थता असलेल्या लोकांमध्ये सामान्य आहेत. अभ्यासात असेही दिसून आले आहे की खाण्याचे विकार असलेल्या लोकांना आत्महत्येचा धोका अधिक असतो.

अमेरिकन पुरुष समाजापासून मोठ्या प्रमामात दूर चालले आहेत. याबाबत पूर्वी अहवाल प्रसिद्ध झाला होता. यापैकी बरेच वेगळे पुरुष पोर्नोग्राफी पाहण्यात अवाजवी वेळ घालवत आहेत, असे समोर आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com