Moskva Dainik Gomantak
ग्लोबल

"तिसरे महायुद्ध झाले सुरु", मॉस्क्वा युद्धनौका बुडाल्यानंतर करण्यात आली घोषणा

रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. युक्रेनियन युद्धात मॉस्क्वा हे नौदलाचे जहाज बुडाल्यानंतर तिसरे महायुद्ध सुरु झाल्याचे रशियाच्या सरकारी टीव्हीने जाहीर केले आहे. मात्र आगीमुळे जहाजाचे नुकसान झाल्याचे रशियाने (Russia) म्हटले आहे. दुसरीकडे, युक्रेनने (Ukraine) दावा केला आहे की, 'आम्ही ब्लॅक सी समुद्रात नेपच्यून क्षेपणास्त्राच्या माध्यमातून रशियन नौदलाचा ताफा उदध्वस्त केला आहे.' परंतु जहाज बुडल्याने रशियन संसदेच्या प्रोपागंडा हथियार प्रेजेंटर ओल्गा साबेयेवा यांनी यास तिसरे महायुद्ध म्हणता येईल असे म्हटले आहे. (World War III has begun Russian state TV announced after the sinking of the Moskva warship)

दरम्यान, युक्रेन युद्धात रशियाला मोठा झटका बसल्याची बातमी यापूर्वीही आली होती. खरं तर, ब्लॅक सी समुद्रात झालेल्या स्फोटात रशियन क्षेपणास्त्र क्रूझर नष्ट झाले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी रात्री उशिरा सांगितले की, युक्रेनमधील लष्करी कारवाईदरम्यान रशियन क्षेपणास्त्र क्रुझर मॉस्क्वा ब्लॅक सी समुद्रात बुडाले, त्यानंतर क्षेपणास्त्र क्रूझर 'मॉस्क्वा' च्या क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात मिसाईल क्रूझरचेही मोठे नुकसान झाले आहे.

तसेच, अनेक युक्रेनियन सरकारी अधिकार्‍यांनी दावा केला की, ओडेसाच्या किनार्‍यावर किंवा जवळ उदध्वस्त केलेल्या मॉस्क्वा क्षेपणास्त्र क्रुझरवर दोनदा हल्ला करण्यात आला होता. रशियन मंत्रालयाने या दाव्यानंतर स्फोटाची पुष्टी केली. आगीच्या कारणाची चौकशी करणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

Goa Politics: खरी कुजबुज; विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

Ranji Trophy 2025: गोव्याचा डाव गडगडला! 'अर्जुन तेंडुलकर' अपयशी; MPच्या सारांशचा प्रभावी मारा

Marina Project: वादग्रस्त ‘मरिना प्रकल्‍प’ नावशीतून मुरगाव बंदरात! पर्यटनाला देणार चालना; BOT तत्त्‍वावर उभारणी सुरू

SCROLL FOR NEXT