Switzerland Dainik Gomantak
ग्लोबल

World Happiness Report 2022: 'या' देशातील लोक संपत्ती दाखवायला लाजतात?

युनायटेड नेशन्सच्या (United Nations) वार्षिक हॅपीनेस इंडेक्समध्ये फिनलंडला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून निवडण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

युनायटेड नेशन्सच्या वार्षिक हॅपीनेस इंडेक्समध्ये फिनलंडला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून निवडण्यात आले आहे. फिनलंडसह डेन्मार्क, आइसलँड (Iceland), स्वित्झर्लंड (Switzerland) आणि नेदरलँड (Netherlands) या देशांचा समावेश टॉप 5 आनंदी देशांमध्ये झाला आहे. ही यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. (World Happiness Report 2022 Finland is the happiest country in the world)

या यादीनुसार, हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा (India) क्रमांक 136 वा आहे. तर आपला शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) 121 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच लोक सुखी राहण्याच्या बाबतीत पाकिस्तान आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहे.

दरम्यान, अमेरिका (America) आणि ब्रिटन (Britain) यांसारख्या देशांबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका 16 व्या तर ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानमध्ये यांची या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. लेबनॉन 144 व्या तर झिम्बाब्वे 143 व्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तान आधीच क्रमवारील तळाशी आहे.

निर्देशांक कोणत्या आधारावर जारी केला जातो?

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जारी करण्याचे हे दहावे वर्ष आहे. दरडोई GDP, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, जगण्याचे स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची धारणा यासारख्या अनेक घटकांवर आधारित निर्देशांक सामान्यत: 150 देशांची क्रमवारी लावतो. त्याचबरोबर त्याची तयारी करण्यासाठी लोकांच्या सुखी जीवनाबरोबरच आर्थिक, सामाजिक आकडेवारीही पाहिली जाते. या वर्षी 146 देशांना या अहवालात स्थान देण्यात आले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युध्दापूर्वी ही नवीन यादी तयार करण्यात आली होती. या यादीत रशियाचा क्रमांक 80 आणि युक्रेनचा क्रमांक 98 आहे.

फिनलंड हा सर्वात आनंदी देश का?

फिनलंड हा उत्तर युरोपमधील एक छोटासा देश असून युरोपियन युनियनचा सदस्य आहे. 1917 पर्यंत फिनलंड रशियन राजवटीखाली होता, परंतु रशियामधील 1917 च्या क्रांतीनंतर, फिनलंडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. फिनलंडने सलग पाचव्या वर्षी सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे मानांकन कायम ठेवण्याचे कारण काय आहे? हे काही उदाहरणांमधून समजून घेऊया...

नैसर्गिक सौंदर्य

फिनलंड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फिनलंड हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. घनदाट जंगले, स्वच्छ तलाव आणि वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव फिनलंडमध्ये आहेत. फिनलंडमध्ये सर्वात मोठे सरोवर Saimaa हे युरोपातील चौथ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. फिनलँड आपल्या नागरिकांना निरोगी जीवन प्रदान करते.

उच्च राहणीमान

फिनलंड, जगातील सर्वात आनंदी देश आहे. देशातील नागरिकांचे उच्च राहणीमान आहे. समृद्ध देश असूनही सरकार इथल्या लोकांना विशेष सुविधा देते.

सर्वोत्तम आरोग्य सेवा

फिनलंडमध्ये आरोग्य सेवा उत्तम सेवांसाठी ओळखली जाते. आर्थिक सुरक्षेसोबतच सरकार नागरिकांना मोफत आरोग्य सेवाही पुरवते. दैनंदिन जीवनात नागरिक समाधानी आहेत.

कमी गुन्हेगारी दर

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये नागरिकांच्या आनंदाचे एक महत्त्वाचे माप म्हणजे लोकांना किती सुरक्षित वाटते. इथे कोणताही गुन्हा घडत नाही. यामुळे फिनलंडमधील लोकांना त्यांच्या देशात सुरक्षित वाटते.

उच्च शिक्षण प्रणाली

काही वर्षांपूर्वी फिनलंडने आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल केला. ज्यांनी लोकांना प्रगतीचा आणि आनंदी होण्याचा मार्ग दाखवला. फिनलंडमधील शिक्षणपद्धती संपूर्ण युरोपमध्ये सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT