World Biggest Crocodile in Malaysia Dainik Gomantak
ग्लोबल

World Biggest Crocodile in Malaysia: जगातील सर्वात मोठ्या मगरीचा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स म्हणाले...

World Biggest Crocodile in Malaysia: मलेशियातील एका मच्छिमाराने खाऱ्या पाण्याच्या सरोवरात जगातील सर्वात मोठी मगर सापडल्याचा दावा केला आहे.

Manish Jadhav

World Biggest Crocodile in Malaysia: मलेशियातील एका मच्छिमाराने खाऱ्या पाण्याच्या सरोवरात जगातील सर्वात मोठी मगर सापडल्याचा दावा केला आहे. याचा एक व्हिडिओ त्याने त्याच्या TikTok अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आतापर्यंतची सर्वात मोठी मगर. ही मगर लोलोंग मगरीपेक्षाही मोठी आहे. लोलोंग ही खाऱ्या पाण्यामधील मगर होती जी 2011 मध्ये फिलीपिन्सच्या बुनावान भागात एका मच्छिमाराला गिळल्यानंतर पकडली गेली होती.

दरम्यान, लोलोंगची लांबी 20.24 फूट आणि वजन 2370 पौंड होते. लोलोंग मगरीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सापडलेली सर्वात मोठी मगर लोलोंग होती, जिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. लोलोंगच्या आधी ऑस्ट्रेलियात अशीच एक मगर पकडली गेली होती. हीसुद्धा खाऱ्या पाण्यात आढळली होती. जिची लांबी 17.97 फूट होती.

यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत

TikTok वर मच्छिमाराने शेअर केलेला व्हिडिओ आतापर्यंत 1.9 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यावर 700 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. काही यूजर्स ही मगर सर्वात मोठी असल्याच्या दाव्याच्या विरोधात आहेत. एका युजरने लिहिले की, लोलोंगच्या तुलनेत हा सरडा आहे. दुसर्‍या यूजरने सांगितले की, लोलोंग ही मगर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात खाईल. तिची लांबी 30 फूट असू शकत नाही.

तिसऱ्या यूजरने सांगितले की, जगातील सर्वात मोठ्या मगरी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड नदीत आढळतात. ज्यामध्ये एका मगरीची लांबी 20 फूट आहे. या मगरी इतक्या धोकादायक आहेत की मासे पकडण्यासाठी आलेल्या मच्छिमारांवरही हल्ला करतात. या विशालकाय मगरी कोणत्याही माणसाचे त्यांच्या जबड्याने तुकडे करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT