Latvia country facing male shortage Dainik Gomantak
ग्लोबल

नवरा भाड्याने पाहिजे! पुरुषांची संख्या कमी झाल्याने ‘या’ देशातील महिला त्रस्त; तासावर मोजले जातायेत पैसे

Latvia: युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार लात्व्हिया देशात पुरुषांच्या तुलनेत १५.५ टक्के अधिक महिलांची संख्या आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या कमी झाल्याने उत्तर युरोपातील लात्व्हिया देशात महिला चांगल्याच त्रस्त झाल्या आहेत. महिलांना लग्नासाठी पुरुष मिळेनासे झाल्याने त्यांनी आता चक्क नवरे भाड्याने मिळविण्यास सुरुवात केलीय. तात्पुरत्या काळासाठी नवरा मिळविण्यासाठी महिला धडपडत असल्याचे वृत्त द न्यूयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केले आहे.

युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार लात्व्हिया देशात पुरुषांच्या तुलनेत १५.५ टक्के अधिक महिलांची संख्या आहे. युरोपीय देशातील सरासरीच्या तुलनेत तीन पट अधिक घट असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 65 आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या दुप्पट असल्याचे वर्ल्ड अटलासने म्हटले आहे.

दररोजच्या आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. “कामाच्या ठिकाणी सर्व महिलाच आहेत. महिलांसोबत कामाचा आनंद येतोच पण, महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्याही तेवढीच असल्यास कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहते. आमच्या अनेक सहकारी इतर देशांत जोडीदाराच्या शोधात गेलेत”, असे मत एका महिलेने द पोस्टशी बोलताना मांडले आहे.

लात्व्हियाच्या अनेक महिला आता नवरा भाड्याने घेण्यास प्राधान्य देत आहेत. कोमॅन्डा २४ यासारख्या प्लॅटफॉर्मवर महिला तात्पुरत्या नवरोबांचा शोध घेत आहेत. महिलांना नवरा घरकामात मदत करण्यासह इतर विविध बांबीमध्ये सहकार्य मिळविण्यासाठी हवा आहे. यात प्लम्बिंग, सुतारकाम, दुरुस्तीचे कामे, टीव्ही जोडणी यासारख्या कामांचा समावेश आहे.

वर्ल्ड अटलासने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, लात्व्हियामध्ये ३१ टक्के पुरुष धूम्रपान करतात यातुलनेत केवळ १० टक्के महिलांना धूम्रपानाचे व्यसन आहे. याशिवाय अनेक पुरुष लठ्ठ किंवा अधिक वजनाचे आहेत. दरम्यान, तासावर नवरा भाड्याने घेण्याची ही शक्कल सध्या लात्व्हियात चांगलीच प्रलचीत झाली असून, बिनलग्नाच्या अनेक महिला याला प्राधान्य देताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

SCROLL FOR NEXT