Kora Duke Family Dainik Gomantak
ग्लोबल

तब्बल 12 वर्षापासून दरवर्षी गर्भवती राहिली ही महिला; वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत झाली 'इतकी' अपत्ये

9 बाळंतपणानंतरही फिट अँड फाईन; सध्याचा जोडीदार केवळ 23 वर्षांचा

Akshay Nirmale

Kora Duke Family: विवाहित दाम्पत्यासाठी आई-वडील होण्याचा अनुभव खूप खास असतो. पालक बनणे हा त्यांच्या जीवनातील एक वेगळा आणि महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळेच पालक झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला जागा नसते. नेवाडा येथील एक महिला सध्या चर्चेत असून ती गेल्या 12 वर्षात 9 वेळा आई झाली आहे.

विशेष म्हणजे वयाच्या 28 वर्षापर्यंतच तिने एकूण 9 अपत्यांना जन्म दिला असून गेल्या 12 वर्षात ती दरवर्षी गर्भवती राहिली आहे. आता तिच्याकडे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. कारण ती तिच्या मुलां-मुलींची आई नव्हे तर बहिण वाटते.

डेली स्टार या न्यूज वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार 39 वर्षीय कोरा ड्यूक आणि तिचा 42 वर्षीय पती आंद्रे हे दाम्पत्य 9 मुलांचे पालक आहेत. कोरा ड्यूक किशोरवयात असतानाच तिचे लग्न झाले होते आणि ती आईदेखील झाली होती.

आज, कोराचे वय 39 इतके आहे. तथापि, वयाच्या 28 व्या वर्षी ती एकूण 9 मुलांची आई होती. कोराने तिच्या सोशल मीडियावर कुटुंबाशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केलेले आहेत. कोरा ही वेटलिफ्टर आहे आणि ती फिटनेसची खूप काळजी घेते.

12 वर्षात 9 मुलांना जन्म

सन 2000 मध्ये, जेव्हा कोरा ही 16 वर्षांची होती, तेव्हा ती पहिल्यांदा गर्भवती राहिली आणि 2001 मध्ये तिने वयाच्या 17 व्या वर्षी तिची मोठी मुलगी एलिजा (21) हिला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी तिने दुसरी मुलगी शीना (20) ला जन्म दिला.

2004 मध्ये तिने तिसर्‍या मुलीला जन्म दिला पण डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. 2005 पासून तिने जहाँ (17), कैरो (16), सैया (14), अवी (13), रोमानी (12) आणि तहजला (10) जन्म दिला आहे. या दाम्पत्याचा सर्वात लहान मुलगा सध्या 10 वर्षांचा आहे.

कोराने 12 वर्षांपासून दरवर्षी गर्भवती असल्याचे TikTok वर उघड केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ती व्हायरल झाली होती. 2012 मध्ये तिने शेवटच्या मुलाला जन्म दिला. सध्या कोरा तिच्या मोठ्या कुटुंबासह आणि 23 वर्षांच्या जोडीदार आंद्रे ड्यूकसह राहते.

दरम्यान, अनेक नेटीझन्स कोराला ट्रोल करत असले तरी इन्स्टाग्रामवर सध्या तिला 4 लाखांहून अधिक लोक फॉलो करत आहेत. विशेष म्हणजे, कोराचे विविध लूक्स व्हायरल होतात. कोरा इतकी तरूण दिसते की ती या मुलांची आई न वाटता त्यांची मोठी बहिणच वाटते.

काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला होता ज्याला 3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ती महिला तिच्या मुलांची एक एक करून ओळख करून देत आहे.

या व्हिडिओतील तिच्या लूकचे लोकांनी कौतुक केले तर अनेकांनी तिला ट्रोलही केले. एकाने नेटकऱ्याने, या महिलेला गर्भनिरोधक हा पर्यायही उपलब्ध आहे, हे माहीत नसेल, असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: काँग्रेसच्या नेत्यांनीच केले होते विरियातोंविरोधात काम!

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT