America पुन्हा भारताच्या पाठिशी,चीनला सुनावले खडे बोल; अरुणाचल प्रदेश हा...

USA: मॅकमोहन सीमारेषेवरुन पून्हा वाद सुरु झाल्याचे दिसून आले होते.
USA- India
USA- IndiaDainik Gomantak

USA Sides With India Over Arunachal Dispute With China: भारत-चीनमध्ये मॅकमोहन सीमारेषेवरुन वाद सुरु असतात. काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर दोन्ही देशामध्ये मॅकमोहन सीमारेषेवरुन पून्हा वाद सुरु झाल्याचे दिसून आले होते.

आता हा वाद दोन्ही देशांपर्यत मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे.अमेरिकेच्या सिनेटने एका प्रस्तावानुसार मॅकमोहन सीमारेषा ही चीन आणि भारतातल्या अरुणाचल प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता दिली आहे.

बिल हेगर्टी यांनी सिनेटमध्ये प्रस्ताव मांडताना म्हटले आहे की, चीन दिवसेंदिवस खुल्या हिंदी समुद्रात गंभीर समस्या म्हणून पुढे येत आहेत. अशावेळी अमेरिका आपल्या भागीदारांसोबत खासकरुन भारतासोबत खांद्याला खांदा मिळवून सोबत आहे असे म्हटले आहे.

USA- India
Russia-US आमनेसामने; काळ्या समुद्रात अमेरिकेच्या ड्रोनला रशियाच्या एयक्राफ्टने...

अमेरिकेच्या सिनेटने या प्रस्तावाला मान्यता देताना अमेरिका दोन्हील देशातल्या या सीमारेषेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता देत आहे. त्याचबरोबर, चीनच्या या आक्रमकतेचा अमेरिका निंदा करते असेही म्हटले आहे.

याशिवाय, खुल्या हिंदी महासागरात चीन( China )ची घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिका- भारता( India )त राजनैतिक करार केले जातील.

क्वाडला मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न केले जाणार असल्याचे अमेरिकेच्या सीनेटने म्हटले आहे. दरम्यान, चीनकडून मॅकमोहन रेषेला मानत नसल्याचे सातत्याने वक्तव्य केले जाते. आता अमेरिकेच्या या घोषणेनंतर चीन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com