Crime  Dainik Gomantak
ग्लोबल

उशीखाली सापडले धार्मिक पुस्तक म्हणून ग्राहकाने केली महिलेची हत्या

हे प्रकरण नायजेरियातील लागोस शहरातील आहे

दैनिक गोमन्तक

सेक्स वर्करच्या खोलीत उशीच्या खाली धार्मिक पुस्तक सापडल्यानंतर ग्राहकाने तिच्यावर हल्ला केला. ग्राहकाने त्याच्या साथीदारांसह सेक्स वर्करला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला पेटवून दिले. हे प्रकरण नायजेरियातील लागोस शहरातील आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

Pulse.ng नुसार , मृत महिलेचे नाव ह्रॅन्ना सलीउ असे आहे. ती लागोस शहरात सेक्स वर्कर म्हणून काम करायची. अलीकडेच, जेव्हा एक ग्राहक हॅन्नाला पैसे देण्यासाठी जात होता, तेव्हा हॅनाने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर तिने पैसे चोरणार असल्याचा आरोप केला.

ग्राहकावर होता चोरीचा आरोप

ग्राहकाने 1000 नायरा (नायजेरियन चलन) दिले होते, परंतु हॅनाने आरोप केला आहे की त्याने 5000 नायरा चोरल्या आहेत. यावरून त्याचा ग्राहकाशी वाद झाला. यावर ग्राहक म्हणाले की, आरोप करण्याऐवजी हॅनाने तिची खोली नीट तपासावी. त्यानंतर ग्राहकाने त्याच्या काही सहकाऱ्यांसह हॅनाची खोली तपासण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार खोलीची झडती घेतली असता, लोकांना हॅनाच्या पलंगावर उशीच्या खाली एक धार्मिक पुस्तक सापडले. हे पाहून ग्राहक आणि त्याचे साथीदार संतापले आणि त्यांनी हॅनाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी हन्‍नाला इतकी मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर तिचा मृतदेह पेटवून दिला.

लागोस पोलिस अधिकारी बेंजामिन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी अबुबकर मुसा, सरौता मन्सूर आणि सुरजो युसूफ अशी या घटनेतील संशयितांची ओळख पटवली आहे. संशयितांनी आधी सेक्स वर्कर हॅन्ना हिला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर वार केल्याचे सांगण्यात आले. नंतर तिला खोलीबाहेर फेकून पेटवून देण्यात आले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

Human Animal Conflict: 'ओंकार हत्ती' पिके नष्ट करण्यासाठीचे आला का? जंगलातील अन्नसाखळी मोडली त्याचे काय?

Goa Theft: ताळगाव झाले आता गणेशपुरी! गुन्हेगारीचा छडा लागेल का? पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान

SCROLL FOR NEXT