अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल येथे गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानातील 100 शीख आणि हिंदूंना ई-व्हिसा मंजूर केला आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत असे सुमारे शंभर व्हिसा जारी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तर ई-व्हिसा ऑनलाइनही मिळू शकतो. (India takes big step after Kabul attack Sikh Hindus get e visa)
काबुल हल्ल्यानंतर, गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील 100 हून अधिक शीख आणि हिंदूंना प्राधान्याच्या आधारावर ई-व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. भारत सरकारने जारी केलेला ई-व्हिसा ऑनलाइन अर्जाद्वारे देखील तुम्हांला मिळू शकतो. दुसरीकडे, गुरुद्वारावर हल्ला झाल्यापासून भारताचे परराष्ट्र मंत्रालय सगळी कडे बारीक लक्ष ठेवून आहे.
यापूर्वी, अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यादरम्यानही गेल्या वर्षी 15 ऑगस्टला गृह मंत्रालयाकडून ई-व्हिसा जारी केला होता. शनिवारी झालेल्या हल्ल्यात एका शीखसह दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर त्यावेळी सात जण जखमी झाले होते. गुरुद्वाराच्या गेटजवळ बंदुकधारींनी हँडग्रेनेड फेकल्याने हा हल्ला झाला होता. अफगाण सुरक्षा कर्मचार्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखून दुसरी मोठी घटना टाळली होती.
घडामोडींवर भारताचे बारीक लक्ष
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हल्ल्यानंतर सांगितले की, काबूल शहरातील पवित्र गुरुद्वारावरील हल्ल्याच्या वृत्तामुळे चिंतेमध्ये आहे. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, गुरुद्वारा कार्ट-ए-परवानवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वांनी तीव्र शब्दात निषेध करायला हवा. हल्ल्याची बातमी मिळाल्यापासून घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमची पहिली आणि प्रमुख चिंता समाजाच्या कल्याणाचीच आहे.
मार्च 2020 मध्ये,
मार्च 2020 मध्ये काबूलमधील गुरुदरावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 25 शीख ठार झाले होते आणि आठ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शीख समुदायावरील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकीच एक होता. शोर बाजार भागात झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.