Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: चोराला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, बहाद्दर महिलेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी अवाक; म्हणाले, 'ही तर ब्रूस लीची आजी...'

Woman Fights Video: एका महिलेने केवळ चोराला पकडलेच नाही, तर त्याला चांगलीच अद्दल घडवत त्याला बेदम मारहाणही केली.

Manish Jadhav

Woman Fights Video: आजकाल सोशल मीडियावर चोरी आणि लुटीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओजमध्ये अनेकदा चोरटे आपली चलाखी वापरुन दुकानदार किंवा आपल्या शिकारला सहजपणे चकमा देताना दिसतात. मात्र, सध्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पूर्णपणे वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने केवळ चोराला पकडलेच नाही, तर त्याला चांगलीच अद्दल घडवत त्याला बेदम मारहाणही केली. महिलेचा हा पराक्रम पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला 'ब्रूस लीची आजी' अशी उपमा दिली.

आधी हा व्हिडिओ पाहा!

एक्स वर व्हायरल होत आहे व्हिडिओ

दरम्यान, हा व्हिडिओ 'एक्स' वर @syadvada169665 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेल्या एका वाक्यानेही लोकांचे लक्ष वेधले, ज्यात म्हटले की, "एका चोराने संपूर्ण चोरी करणाऱ्या समाजाची मान खाली पाडली." या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात एक महिला काहीतरी काम करत उभी आहे. त्याचवेळी तिच्या पाठीमागे उभा असलेला एक व्यक्ती दुकानात ठेवलेल्या एका वस्तूवर नजर ठेवतो आणि संधी साधून ती वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करतो.

पण, त्याचा डाव त्याच्यावरच उलटतो. झाले असे की, ती महिला (Women) त्याला चोरताना पाहते आणि क्षणाचाही विलंब न लावता धावत जाऊन त्याला पकडते. त्यानंतर ती त्याला जमिनीवर पाडते आणि तो पळून जाऊ नये म्हणून त्याला आपल्या पायांनी घट्ट पकडून ठेवते. यावेळी ती महिला त्याला चांगलाच तोप देते. आवाज ऐकून दुकानातील आणखी एक व्यक्ती बाहेर येतो आणि चोराला पकडण्यास मदत करतो. मात्र, तोपर्यंत ती महिला त्या चोराला मारतच राहते.

यूजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स'वर आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी यावर मजेशीर आणि दमदार प्रतिक्रिया दिल्या आहेत, ज्या व्हिडिओच्या लोकप्रियतेला अधिकच वाढवतात. एका युजरने लिहिले की, "हेच म्हणतात की, उंट आया पहाड के निचे ." या वाक्याचा अर्थ असा की, जेव्हा एखादा अहंकारी व्यक्ती नमतो किंवा त्याला योग्य जागा मिळते, तेव्हा या वाक्याचा प्रयोग केला जाते. इथे चोराच्या बाबतीतही हेच घडले.

दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "ही नक्कीच जीमला जाणारी महिला असेल, चोर बिचारा!" ही प्रतिक्रिया महिलेच्या शारीरिक ताकदीचे कौतुक करते, ज्यामुळे ती चोराला सहज हरवू शकली. एका अन्य युजरने लिहिले की, "वाह, काय ताकद दाखवली त्या महिलेने. चोराला असाच धडा शिकवला पाहिजे." या प्रतिक्रियातून लोकांचा चोरांबद्दलचा राग आणि महिलेच्या कृत्याबद्दलचे कौतुक स्पष्टपणे दिसून येते.

याचबरोबर, काही यूजर्संनी विनोद करत लिहिले की, "म्हणायचे काय आहे की, मर्द असूनही एका महिलेकडून मार खाल्ला?" या प्रतिक्रिया समाजामध्ये असलेले लिंगभेद आणि पुरुषी अहंकारालाही स्पर्श करतात, ज्यामुळे या व्हिडिओवर अधिक व्यापक सामाजिक चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT