Malaysia Viral News Dainik Gomantak
ग्लोबल

Malaysia: मासा खाल्ल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू, पती कोमात, ICU मध्ये उपचार सुरू; 'हा' आहे तो विषारी मासा

पफर फिश, जे एक लोकप्रिय जपानी स्वादिष्ट पदार्थ आहे. मात्र, यात टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन हे शक्तिशाली आणि घातक विष असू शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मलेशियातील एका 83 वर्षीय महिलेचा एक मासा खाल्ल्याने मृत्यू झाला असून, तिच्या पतीवर अजूनही अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. स्थानिक मीडिया आउटलेटचा हवाला देत न्यूयॉर्क पोस्टने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

मलेशियातील जोहरमध्ये 25 मार्च रोजी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, या दाम्पत्याने नेमका कोणत्या प्रकारचा मासा खाल्ला याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दाम्पत्याच्या मुलीने एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आई -वडिलांनी पफर फिश नावाचा विषारी मासा स्थानिक दुकानदाराकडून विकत आणला व शिजवून खाल्ला.

माझे आई -वडिल बर्‍याच वर्षांपासून एकाच दुकानदाराकडून मासे विकत घेत आहेत, त्यामुळे वडिलांनी याबद्दल अधिक विचार केला नाही. असेही ती म्हणाली.

दाम्पत्याने दुपारच्या जेवणासाठी मासे स्वच्छ करून शिजवल्यानंतर काही वेळातच, लिम सिव गुआन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिला थरथर कापू लागल्या आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सुमारे एक तासानंतर तिच्या पतीलाही अशीच लक्षणे दिसायला सुरुवात झाली.

त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या महिलेला मृत घोषित करण्यात आले. फिशमधून न्यूरोलॉजिकल प्रकटीकरण होऊन अन्न विषबाधा आणि कार्डियाक डिसिरिथमियासह श्वसनक्रिया बंद पडणे असे सांगण्यात आले. सिग्वेटेरा टॉक्सिन किंवा टेट्रोडोटॉक्सिन अंतर्ग्रहणामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, लोकांनी अन्न निवडताना किंवा खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: ज्यातून अधिक धोका आहे, असे अन्न खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला असून, तिचे पती कोमात असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते, पफर फिश, जे एक लोकप्रिय जपानी स्वादिष्ट पदार्थ आहे. मात्र, यात टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन हे शक्तिशाली आणि घातक विष असू शकतात. हे विष सहसा नष्ट केले जाऊ शकत नाहीत. काही उच्च शिक्षित शेफ यांना हे विष कसे काढायचे याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assmbly Live: आनी मुख्यमंत्री म्हणटा भिवपाची गरज ना... - व्हेंन्झी व्हिएगस

नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

Sara Tendulkar: 1137 कोटी… सचिनच्या लेकीचा 'मास्टरस्ट्रोक', पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार काम

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

SCROLL FOR NEXT