Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

Ex-बॉयफ्रेंडच्या घराच्या दारावर गर्लफ्रेंडचा Bomb Attack, भिंतीवर लिहिला 'हा' मेसेज; कोर्टाने सुनावली 6 वर्षांची शिक्षा

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा कोणत्याही विवाहित जोडप्याच्या बाबतीत, एका जोडीदाराकडून फसवणूक झाल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात.

Manish Jadhav

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा कोणत्याही विवाहित जोडप्याच्या बाबतीत, एका जोडीदाराकडून फसवणूक झाल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात. अशा परिस्थितीत, विश्वासघात झालेला दुसरा जोडीदार एकतर रडू लागतो किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. बदला घेण्यामध्ये लोक मग सोशल मीडियावर आपल्या जोडीदाराबाबत अपमानास्पद गोष्टी लिहितात, तर कधीकधी त्याचा सोशल मीडिया आयडी हॅक करतात किंवा त्याची गुपिते मित्रांसमोर उघड करतात. पण ब्रेकअपमुळे चिडलेल्या एका गर्लफ्रेंडने आपल्या Ex-बॉयफ्रेंडसोबत असे काही केले की, जाणून तुम्हालाही धक्का बसेल...

Ex-बॉयफ्रेंडच्या फ्लॅटबाहेर...

लॉरेन मेरी टॅलबोट असे या गर्लफ्रेंडचे नाव आहे. ती नॉर्थम्प्टनमध्ये राहते. 18 जून 2023 च्या रात्री तिने तिच्या Ex-बॉयफ्रेंडच्या फ्लॅटबाहेर मोठा स्फोट घडवून आणला. स्फोटामुळे घराचे दोन दरवाजे तुटले, भिंतीना तडे गेले आणि घराचे कार्पेटही जळाले. नॉर्थंट्स पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना भिंतीवर लिहिलेले आढळले - ''हा फ्लॅट नरकात जळेल.''

सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

दुसरीकडे, सुदैवाने तिचा Ex-बॉयफ्रेंड त्यावेळी घरी नव्हता. तथापि, पुराव्यावरुन असे दिसून आले की, लॉरेनने हे गृहित धरुन घराबाहेर बॉम्ब स्फोट केला की घरामध्ये कोणीतरी असेल. दरम्यान, लॉरेनला अटक करण्यात आली असून खुनाच्या उद्देशाने जाळपोळ केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, न्यायालयाने लॉरेनला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली. मात्र, स्फोटापूर्वी दोघांमध्ये कशावरुन वाद झाला होता, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

संपूर्ण ब्लॉकला आग लागली असती

डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल रोइसिन हॅरिसन म्हणाले: 'लॉरेनने कोणाचा तरी खून केला असता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही हे नशीबच म्हणावे लागेल. न्यायमूर्ती म्हणाले की, लॉरेनच्या या कृतीमुळे फ्लॅटच्या संपूर्ण ब्लॉकमध्ये अगदी सहजरित्या आगीचा भडका उडू शकला असता. परंतु मला आशा आहे की, ती तुरुंगात असताना यावर विचार करेल.

यापूर्वीही असेच प्रकरणे समोर आले होते

काही दिवसांपूर्वी अशीच एक बातमी आली होती, ज्यात इंग्‍लंडमधील लिव्हरपूल येथे राहणारी 49 वर्षीय महिला Buathip Kendray ने आपली फसवणूक करणारा बॉयफ्रेंड स्टीव्हन वुड्ससोबत जे काही केले ते आयुष्यभर विसरणार नाही. लिव्हरपूल इकोनुसार, 6 ऑगस्ट 2023 रोजी, आपली फसवणूक केल्याबद्दल संतापलेली Buathip Kendray वुड्सच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने त्याच्या घराला क्षती पोहोचवली. यादरम्यान Kendray घरात घुसल्याचे समजल्यानंतर वुड्सने तात्काळ आपल्या बेडरुमचा दरवाजा आतून बंद केला आणि पोलिस येण्याची वाट पाहू लागला. अत्यंत अस्वस्थ झालेल्या Kendray ने बेडरुमचा दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिला अपयश आले. अखेर पोलिसांनी तिला पकडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT