Japan to join NATO Soon to tackle China And Russia. Dainik Gomantak
ग्लोबल

China, Russia Vs Japan : आता नाटो जपानच्या पाठीशी, आशियामध्ये बदलणार समीकरण

Japan NATO Vs China Russia: NATO देश आता जपानसोबतचे संबंध मजबूत करण्यात व्यस्त आहेत. रशिया आणि चीन या दोन्ही देशांच्या युतीमुळे जपानला युद्धाची मोठी भीती वाटत आहे. जपान अमेरिकेकडून सातत्याने घातक शस्त्रे खरेदी करत आहे. जपानच्या संरक्षण बजेटनेही नवीन उंची गाठली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Politics Of Asia

रशियाच्या विरोधात युक्रेनच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले नाटो देश आता आशियातील शक्ती संतुलनावरही परिणाम करणार आहेत. जपान आणि नाटो देश आपले सहकार्य वाढवणार आहेत. जपान आणि नाटो देश एक नवीन करार करणार आहेत ज्यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होतील.

तसेच, रशिया आणि चीनशी व्यवहार करण्यासाठी एक समान फ्रेमवर्क तयार केले जाईल. रशिया आणि चीनमधील लष्करी संबंध दृढ होत असताना जपान आणि नाटो देश हे सहकार्य वाढवणार आहेत.

रशिया आणि चीनने अलीकडेच त्यांच्या लढाऊ विमाने आणि बॉम्बर्ससह जपानजवळ उड्डाण केले आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जपाननेही आपली लढाऊ विमाने हवेत सोडली. जपान अजूनही या 31 सदस्यीय लष्करी संघटनेचा सदस्य देश नाही पण तो 'ग्लोबल पार्टनर' नक्कीच आहे.

2014 मध्ये जपान आणि नाटो देशांनी एक करार केला. त्यात सागरी सुरक्षा आणि मानवतावादी सहाय्य समाविष्ट होते परंतु सैन्यांमधील सहकार्य समाविष्ट नव्हते. आता हे सहकार्य वाढवण्याची योजना आहे.

या वर्षी जुलैमध्ये लिथुआनियामध्ये नाटो देशांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनाही या नाटो बैठकीत आमंत्रित करण्यात आले असून ते युक्रेनला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.

या बैठकीत नाटो जपानमध्ये पहिले आशियाई कार्यालय उघडण्याची औपचारिक घोषणा करू शकते. यापूर्वी जून महिन्यात किशिदा यांनी नाटो परिषदेत सहभाग घेतला होता. असे करणारे ते पहिले जपानी नेते होते.

नव्या करारात चीन आणि रशियाच्या बाबतीत दोन्ही बाजू समान भूमिका घेण्याचा प्रयत्न करतील. अलीकडच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये जिथे रशियाला धोका असल्याचे वर्णन करण्यात आले होते, तिथे चीनला आव्हान म्हणून संबोधण्यात आले होते.

या करारात सायबर आणि स्पेसचाही उल्लेख आहे जिथे चीन आणि रशिया हे दोन्ही देश जवळून सहकार्य करत आहेत. तैवानसोबतच चीनही त्याला लक्ष्य करू शकतो, अशी भीती जपानला वाटत आहे.

चीन आणि जपानमध्ये बेटांवरून वाद सुरू आहे. चीनच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जपान अमेरिका घातक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने खरेदी करत आहे. जी-7 देशांनी अलीकडेच त्यांच्या बैठकीत चीनच्या लष्करी तयारीवर तीव्र चिंता व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT