Global Coronavirus Updates Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोना महामारीचा अंत होणार? WHO तज्ज्ञ म्हणताहेत...

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांची या विषयाबाबत चर्चा सुरू

दैनिक गोमन्तक

Global Coronavirus Updates : ज्या कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले होते त्या कोरोना महामारीचा जोर ओसरत असल्याचे चित्र जगभरातील अनेक देशांमध्ये दिसत आहे. अशातच आता कोरोना महामारीचा अंत झाला असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांची या विषयाबाबत चर्चा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीची सुरुवात झाली होती. कोरोना महामारी संपुष्टात आली आहे, असे जाहीर केल्यास त्याचे काय परिणाम होतील यावरही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. (Will the Corona epidemic end WHO experts says)

संपूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या (Corona Patients) संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महामारीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना महासाथीची लाट संपुष्टात आल्याची घोषणा करण्याबाबत संबंधित समिती आवश्यक निकषांची पडताळणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिथून कोरोनाची खरी सुरुवात झाली, त्या चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाची संक्रमणे आढळली आहेत. जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच, रविवारी चीनमध्ये कोरोना संसर्गाची 3300 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. अनेक शहरांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT