Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban-Pakistan: तालिबान आणि पाकिस्तान मध्ये का आहे वैर

Taliban-Pakistan: तालिबानमार्फत पाकिस्तान अफगानिस्तानवर नियंत्रण ठेवले जाऊ शकेल असा त्यापाठीमागचा हेतू होता

दैनिक गोमन्तक

Taliban-Pakistan: पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील चकमकींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अफगानिस्तानमध्ये जेव्हा तालिबान राजवट आली तेव्हा पाकिस्तानने तालिबानचे स्वागत केले होते. तालिबानमार्फत पाकिस्तान अफगानिस्तानवर नियंत्रण ठेवले जाऊ शकेल असा त्यापाठीमागचा हेतू होता.

आता मात्र पाकिस्तान आणि तालिबानमध्ये समस्या निर्माण होताना दिसत आहे. चमन बॉर्डरवरील वाद आता टोकाला गेला आहे.त्याचबरोबर,तालिबानने अफगानिस्तान ( Afganistan )आणि पाकिस्तानमध्ये असलेली सीमारेषा मानण्यासदेखील नकार दिला आहे. कधीकाळी आयएसआयचे तालिबानवर नियंत्रण होते आता मात्र तालिबानने वैर निर्माण केले आहे. याचे कारण म्हणजे तालिबानला पाकिस्तान आपल्याला आव्हान देईल असे वाटते . अमेरिके ( USA )च्या हल्ल्यात अलकायद्याच्या अल जवाहिरीचे पाकिस्तानच्या भूमीवर मारले जाणे हे तालिबान आणि पाकिस्तानमध्ये दुरावा आणण्यास कारणीभूत ठरले आहे.त्याचबरोबर,तालिबान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारत आहेत.पाकिस्तानचे भारतविरोधी धोरण आहे,त्यामुळेदेखील या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.

तालिबानने अनेकदा हे स्पष्ट केले आहे की,आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कोणत्याही देशाबरोबर संबंध ठेवण्यास तयार आहे.त्याचबरोबर हेसुद्धा स्पष्टकेले आहे की, आपल्या देशाच्या भूमीचा कोणच्याही देशाला कोणत्याही देशाविरुद्ध काम करु देणार नाही.याच पार्श्वभूमीवर ,तालिबान (Taliban) ने भारताला सलमा डॅमसोबतच इतर वीस प्रकल्प पूर्ण करण्यास मंजूरी दिली आहे.आता पाकिस्तान यावर आपली काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT