Pakistan PM Shahbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

India Pakistan Trade: पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला भारत देणार आधार? व्यापारासंबंधी शाहबाज सरकामधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

India Pakistan Trade: पाकिस्तान आपली ढासळत चाललेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सतत धडपडत आहे.

Manish Jadhav

India Pakistan Trade: पाकिस्तान आपली ढासळत चाललेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सतत धडपडत आहे. आता पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमधील परराष्ट्र मंत्री आणि नवाझ शरीफ यांचे जवळचे मित्र इशाक दार यांनी भारताशी पुन्हा व्यापार सुरु करण्याच्या चर्चेवर भर दिला आहे. शाहबाज शरीफ यांच्या मंत्र्याचे हे विधान पाकिस्तान भारतासोबत व्यापारी संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याचे संकेत देत आहे. दरम्यान, दार यांनी अनेकदा भारताशी पुन्हा व्यापार सुरु करण्याचा आग्रह धरल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना कांदे आणि टोमॅटो पाकिस्तानला पाठवण्याची विनंती केली आहे. मात्र भारताने नेहमीच देशाच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले आहे. भारताने नेहमीच म्हटले आहे की, मैत्री आणि दहशतवादाला आश्रय देणे एकाच वेळी शक्य नाही.

पाकिस्तान भारताशी व्यापार करण्यास उत्सुक

दार यांनी गेल्या महिन्यात लंडनमध्ये पत्रकार परिषदेत भारतासोबत पुन्हा व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याच्या शक्यतेचे संकेत दिले होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध पूर्ववत व्हावेत, असे पाकिस्तानच्या व्यापारी समुदायाला वाटते, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर विरोधी पक्ष आणि समिक्षकांनी सडकून टीका केली होती. तथापि, दार यांनी गुरुवारी त्यांच्या मागील टिप्पण्यांचा बचाव करत म्हटले की, अनेक व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते भारतीय माल तिसऱ्या देशाद्वारे आयात करत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. म्हणून ते दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यावर भर देत आहेत.

पाकिस्तानमध्ये परिस्थिती बिघडली

ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखी ताणले गेले. तेव्हापासून भारतासोबतचे व्यापारी संबंध पूर्ववत झाल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे पाकिस्तानने सातत्याने सांगितले आहे. तथापि, याआधीही व्यापार अंशतः पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले गेले. पहिल्यांदा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारच्या काळात आणि दुसऱ्यांदा पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) च्या काळात संबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पाकिस्तानी वृत्तपत्र ट्रिब्यूनच्या मते, मार्च 2021 मध्ये पाकिस्तानी मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीने (ECC) भारतासोबत व्यापार आंशिकपणे पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनीही ईसीसीच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. तथापि, काही सदस्यांनी या निर्णयाला राजनितीक आत्महत्या असल्याचे म्हटल्यानंतर फेडरल कॅबिनेटमध्ये इम्रान खान यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता.

भारताची भूमिका काय आहे?

पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भारताच्या भूमिकेत बदल होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अनेकवेळा पाकिस्तानशी मैत्री तेव्हाच शक्य होईल, जेव्हा शेजारी राष्ट्र दहशतवादाबाबत गंभीरपणे विचार करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT