Chinese President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

Middle East: मिडिल ईस्टचा 'दादा' बनायचयं चीनला; काय आहे जिनपिंग यांचा प्लॅन?

China Policy: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवून चीनला मध्यपूर्वेत जागतिक लीडर म्हणून स्वत:ला प्रस्थापित करायचे आहे.

Manish Jadhav

China Policy: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवून चीनला मध्यपूर्वेत जागतिक लीडर म्हणून स्वत:ला प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळेच तो सातत्याने युद्धबंदीचा वकिली करत आहे आणि जगातील देशांकडे त्यासाठी आवाहन करत आहे. सोमवारी, चीनच्या सर्वोच्च राजनैतिकाने पुन्हा एकदा बीजिंगमध्ये जगातील देशांना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. बीजिंगमध्ये मुस्लिम देशांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, गाझाचा विध्वंस थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला कठोर पावले उचलावी लागतील.

दरम्यान, इस्लामिक सहकार्य संघटनेच्या प्रमुखांसह सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त, पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरण आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री बीजिंगच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी त्यांचे स्वागत केले. वांग यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करण्याचे आवाहन करुन चर्चेला सुरुवात केली. जगातील सर्व देशांना आवाहन करण्यासोबतच चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की - 'या संघर्षात चीन न्याय आणि निष्पक्षतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे'.

गाझाला मदतीची गरज आहे

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले - 'मेसेज स्पष्ट आहे, युद्ध ताबडतोब थांबले पाहिजे आणि गाझामध्ये मदत सामग्री पोहोचवली पाहिजे.' शिष्टमंडळात समाविष्ट असलेल्या सर्व देशांनी चीन आणि इतर देशांना या दिशेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, असेही ते म्हणाले. वास्तविक, इस्रायल गाझामध्ये सातत्याने जमिनी कारवाई करत आहे, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हे हल्ले सुरु झाले होते. इस्रायलचा दावा आहे की, हमासने गाझामध्ये सुमारे 200 ओलीस लपवले आहेत.

युद्धबंदीमध्ये चीनला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष शांत करण्यासाठी इस्रायलला सक्रिय भूमिका बजावायची आहे, हेच कारण आहे की चीनला जागतिक शक्ती म्हणून आपली शक्ती वाढवायची आहे. एकीकडे अमेरिका कतारच्या मध्यस्थीने इस्रायली ओलिसांची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, चीनचे अमेरिकेशी मतभेद असल्याने चीनला अमेरिकेपुढे स्वतःला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे चीन सातत्याने युद्धबंदीचे आवाहन करत आहे. इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईवर चीन सातत्याने टीका करत आहे, मात्र हमासचे नाव घेणे टाळतो.

इस्रायलने गाझामधील लोकांना सामूहिक शिक्षा देऊ नये

शिष्टमंडळाशी बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, इस्रायलने गाझामधील लोकांवर सामूहिक शिक्षा देऊ नये. मोठ्या प्रमाणात मानवतावादी संकट टाळण्यासाठी, एक मानवतावादी कॉरिडॉर शक्य तितक्या लवकर उघडला पाहिजे. चीनने इस्रायलने केलेल्या कारवाईला विरोध करताना म्हटले आहे की, इस्रायल दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या नावाखाली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याआधीही चीनने तात्काळ युद्धबंदीसाठी सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रांमध्ये शांतता दूत पाठवला होता.

अमेरिकेवर राजनैतिक दबाव

गेल्या आठवड्यात यूएनमध्ये संघर्षावर पहिला ठराव पास केला, ज्यामध्ये हमासने पकडलेल्या ओलीसांची तात्काळ सुटका आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनने या मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. यानंतर चीनचे राजदूत झांग जून म्हणाले की, 'परिषदेचे स्थायी सदस्य अडथळे निर्माण करत आहेत.' हे वक्तव्य अमेरिकेवर अप्रत्यक्ष हल्ला मानले जात होते. बीजिंगमध्ये सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी चीनच्या नेतृत्वाखाली सुरक्षा परिषदेच्या निर्णयाचे कौतुक केले. चीनला अरब जगतातील अनेक देशांशी आपले संबंध दृढ करण्याची संधी मिळाली असल्याचे मानले जात आहे. याशिवाय, या युद्धामुळे अमेरिका आणि त्याचे जुने मित्र राष्ट्र यांच्यात तेढ निर्माण होऊ शकते, अशी आशाही चीनला आहे. वांग यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, चीनने नेहमीच अरब आणि मुस्लिम देशांच्या कायदेशीर हक्क आणि हितांचे रक्षण केले आहे.

चीनने मध्यपूर्वेत दूत पाठवला

गेल्या महिन्यात चीनने आपले विशेष दूत झांग जून यांना मध्यपूर्वेच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर पाठवले होते. झांग यांनी इजिप्त, कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि जॉर्डनला भेट दिली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात झांग यांनी तुर्की आणि बहरीन दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांची भेट घेतली. याशिवाय झांग यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने सिंगापूर, अमेरिका आणि युरोपच्या प्रतिनिधींशी क्षेत्रीय परिस्थितीवर चर्चा केली होती. मात्र, चीनच्या मुत्सद्देगिरीचा आतापर्यंत काहीही परिणाम झालेला नाही. विशेष म्हणजे, या दौऱ्यात इस्रायल, पॅलेस्टाईन आणि इराणमधील स्टॉपचा समावेश नव्हता. तथापि, वांग यी यांनी गेल्या महिन्यात इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी फोनवर चर्चा केली.

बायडन-जिनपिंग यांच्यातही चर्चा झाली

बायडन आणि जिनपिंग यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत इस्रायल-हमास संदर्भात चर्चा झाली. जवळपास चार तास चाललेल्या या चर्चेत बायडन यांनी शी यांना व्यापक क्षेत्रीय तणाव कमी करण्यासाठी इराणशी बोलण्यास सांगितले. सीएनएनच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी यावर सांगितले की, त्यांची इराणशी चर्चा झाली आहे. चर्चेत बायडन यांनी स्पष्ट केले होते की, ते हमासला पॅलेस्टिनींपासून वेगळे मानतात. अमेरिका हमासला एक दहशतवादी संघटना मानते, ज्याने पॅलेस्टिनी लोकांचे दुःख कायम ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT