Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: जहाजांवर हल्ले, अमेरिकेच्या ठिकाणांना केलं टार्गेट; नवीन वर्षही युद्धाच्या सावटाखाली?

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु झाले. अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी हे युद्ध अजूनही सुरुच आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु झाले. अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी हे युद्ध अजूनही सुरुच आहे. दरम्यान, नववर्षापूर्वी हे युद्ध इतर अनेक देशांना वेठीस धरु शकते. त्याचे कारण म्हणजे समुद्रात भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांच्या व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले. हे हल्ले इराण समर्थक हिजबुल्लाहने केले आहेत. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर दिसून येण्याची शक्यता आहे. इराणने याआधीही अनेकवेळा सांगितले आहे की, इस्रायलने सहमती दर्शवली नाही तर युद्ध गाझापर्यंत मर्यादित राहणार नाही.

दरम्यान, अमेरिकन ठिकाणांवर अनेक ड्रोन हल्ल्यांनंतर अमेरिका आणि त्याचे मित्र देश सतर्क झाले आहेत. परिस्थिती अशी आहे की, अमेरिकेत ख्रिसमसपासून नवीन वर्षापर्यंत सुट्टी असते, परंतु या काळातही बायडन प्रशासन करडी नजर ठेवून आहे. याचे कारण म्हणजे इराण समर्थित अतिरेकी संघटना समुद्रात केव्हाही हल्ला करु शकतात. याशिवाय, इराकसह अनेक देशांमध्ये अमेरिकन ठिकाणांवर हल्ले झाले आहेत. हिंदी महासागरापासून लाल समुद्रापर्यंत इतर देशांच्या जहाजांना लक्ष्य करुन अनेक हल्ले झाले आहेत.

अमेरिकन तळांवर हल्ले आणि नंतर प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ले

याशिवाय, इस्रायलने हमाससोबतचे युद्ध अनेक महिने सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे नवीन वर्षात युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी बायडन यांनी हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचे आदेश दिले. हिजबुल्लाहने अमेरिकन ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर हा हल्ला झाला. परंतु हे हल्ले इथेच थांबले नाही, मंगळवारी हुती बंडखोरांनी लाल समुद्रात ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रे डागली.

इराणी जनरलच्या हत्येनेही तणाव वाढला, इस्रायलवर आरोप

इराण समर्थित अतिरेकी संघटना समुद्रातून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर हल्ला करु शकतात, याचा पुनरुच्चार अमेरिकेने यापूर्वीही अनेकदा केला आहे. इराणने युद्धामधील आपला सहभाग नाकारला असला तरी इराणने हुती आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याचे सर्वश्रुत आहे. शनिवारी भारताकडे येणारे एक जहाजही इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अडकले होते. इराणचा कमांडर सय्यद राजी मौसावी याच्या हत्येनंतर हे युद्ध आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यामागे इस्रायलचा हात असल्याचे इराणचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT