Israel-Hamas War: गाझावरील इस्रायली हल्ले तीव्र; हमास कमांडर याह्या सिनवार म्हणाला, ''हमास अभूतपूर्व युद्धाचा...''

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाचा आज 81 वा दिवस आहे. जगभरातील अनेक देश आणि नेते इस्रायलवर युद्धबंदीसाठी दबाव आणत आहेत.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाचा आज 81 वा दिवस आहे. जगभरातील अनेक देश आणि नेते इस्रायलवर युद्धबंदीसाठी दबाव आणत आहेत, मात्र इस्रायल गाझा पट्टीवर दिवसेंदिवस हल्ले वाढवत आहे. हमासने दावा केला होता की, ते इस्रायलशी अनेक महिने युद्ध करु शकतात. हमासने या बोगद्यांमध्ये शस्त्रास्त्रे आणि रेशनचा साठाही केला होता. मात्र, आता हमासचा पाय अधिकच गर्तेत अडकत चालला आहे. हमासचा कमांडर याह्या सिनवार याने 7 ऑक्टोबरनंतर प्रथमच विधान केले आहे. सिनवार म्हणाला की, हमासला अभूतपूर्व युद्धाचा सामना करावा लागत आहे. याह्या सिनवार हा हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड होता असे मानले जाते.

सिनवार म्हणाला की, 'हमास एक भयंकर आणि अप्रत्याशित युद्ध करत आहे. इस्रायली सैन्य गाझा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.' इस्त्रायली लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचेही सिनवारने सांगितले. हमासने एक हजाराहून अधिक इस्रायली सैनिकांना ठार केल्याचा दावा सिनवारने केला. गाझामध्ये 156 सैनिक मारले गेल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: ख्रिसमसच्या दिवशी गाझामध्ये 70 हून अधिक जणांचा मृत्यू, इस्रायली हल्ले सुरुच!

तेल अवीवच्या मते, याह्या सिनवार हा गाझामधील हमासचा सर्वात मोठा कमांडर आहे. त्याने गाझामध्ये इस्रायली सैन्याला ठेचून काढण्याची शपथ घेतली आहे. दुसरीकडे, अनेक देशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा खात्मा होईपर्यंत युद्धविराम होणार नाही, असेही सांगितले. इस्रायल आणि हमास यांच्यातील इजिप्तच्या प्रस्तावित करारावर सिनवार म्हणाला की, कोणत्याही स्थितीत कब्जा सहन केला जाणार नाही.

दुसरीकडे, इजिप्तने हमास आणि इस्रायलमध्ये कायमस्वरुपी युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. गाझामध्ये सर्वसमावेशक पॅलेस्टिनी सरकार स्थापन करावे आणि सर्व इस्रायली ओलीसांची सुटका करावी, असे त्यात म्हटले आहे. मात्र, हमासने हा प्रस्ताव मान्य केला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com