Drink More-Boost Economy in japan  Dainik Gomantak
ग्लोबल

Japan सरकारचे अजब-गजब आवाहन; महसूलात वाढ करण्यासाठी ठेवली मद्यपान स्पर्धा

जपान सरकार तरुणांना जास्तीत जास्त मद्यपान करण्याचे आवाहन का करत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे

दैनिक गोमन्तक

Drink More-Boost Economy: दारूपासून दूर राहण्यासाठी अनेक लोकं कितीतरी उपाय करतात. सरकार नविन योजना आखतात. लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत मद्यपान केल्याने होणार्‍या आरोग्याच्या हानीवरही दारू सोडण्याची जाणीव जनजागृतीच्या माध्यमातून केली जाते. एकीकडे, बहुतेक लोक दारू सोडण्याच्या बाजूने आहेत. तर दुसरीकडे जपान सरकार तरुणांना जास्तीत जास्त दारू पिण्याचे आवाहन करत आहे. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की, जपान सरकार असे आवाहन का करत आहे?

जपानमधील सध्याची पिढी त्यांचे आई-वडील, वडीलधारी किंवा पूर्वजांपेक्षा कमी दारू पीत आहे. त्यामुळे दारूवरील कर कमी झाला आहे. महसुलात कपात झाली त्यामुळे भविष्याची चिंता जपान सरकारला वाटू लागली आहे. नागरिकांना दारू प्यायला लावण्यासाठी सरकारने व्यवसायाची कल्पना अमलांत आणली आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून सरकारने ही कल्पना आणली आहे. या स्पर्धेत पुरस्काराची योजनाही ठेवण्यात आली आहे. तरुण पिढीने अधिक मद्यपान केल्यास जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. स्पर्धेत, सहभागी होणाऱ्या तरूणांना जास्त मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याऱ्या आयडीया द्याव्या लागणार आहेत.

कुणाला घेता येणार स्पर्धेत सहभाग?

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 20 ते 39 वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. या विचारांतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारूचे सेवन कसे करता येईल किंवा कसे वाढवता येईल हे सांगावे लागेल. कारण मद्यविक्रीत लक्षणीय घट झाली आहे. यामध्ये स्पर्धकांमध्ये प्रमोशन, ब्रँडिंग यासह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती आखावी लागणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आयडीयांना प्राधान्य दिले जाईल.

जपानी माध्यमांनी ही माहिती दिली

जपानी प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे की, 'आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल काही भागातून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी सोशल मीडियावरही आपले विचार मांडले आहेत. इच्छुक तरुण सप्टेंबरअखेर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. नोव्हेंबरमध्ये तज्ज्ञांच्या सल्यानुसार नविन योजना आखल्या जाईल. यानंतर, अधिक दारू पिण्यासाठी एक योजना विकसित केली जाईल.

'मद्य सेवन एक चतुर्थांश घटले'

तरुणांना अधिक दारू पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत एक वेबसाइट तयार केली आहे. ज्यानुसार, टॅक्स एजन्सीच्या अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 1995 च्या तुलनेत 2020 मध्ये लोक कमी दारू पीत होते. जपानचे वाईन मार्केट कमी होत आहे. अंदाजे मद्य सेवन एक चतुर्थांश कमी झाले आहे. जपान टाइम्स वृत्तपत्रानुसार, 1980 मध्ये एकूण महसुलाच्या 5 टक्के महसूल मद्य कराने गोळा केला जातो. या वेबसाईटनुसार 2020 मध्ये हा आकडा केवळ 1.7 टक्के झाला होता म्हणून जपान सरकारने ही मोहिम राबवली आहे.

जपानमधील एक तृतीयांश लोकसंख्या 65 पेक्षा जास्त आहे

जागतिक बँकेच्या मते, जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश (29%) लोकसंख्या 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आहे. जगातील सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे. जपानची चिंता केवळ अर्थव्यवस्थेची नाही. त्यापेक्षा काही नोकऱ्या, तरुण कर्मचाऱ्यांचा पुरवठा, भविष्यात वृद्धांची काळजी आदी समस्याही सोडविण्याचे नियोजन जपान सरकार करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

Sub-Junior Aquatics Championships: गोव्याच्या पूर्वी नाईकचा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स; 2 सुवर्ण, 1 रौप्य जिंकलं

SCROLL FOR NEXT