Karima Baloch & Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानविरोधात आवाज उठवणारी 'करीमा' कोण होती? पीएम मोदींना मानल होतं 'भाऊ'

बलुचिस्तान चळवळीचा मोठा चेहरा असलेल्या करीमाचा मृतदेह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅनडामध्ये (Canada) सापडला होता.

दैनिक गोमन्तक

जगभरात आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे, आणि लोकांना पुन्हा एकदा करीमा बलोचची (Karima Baloch) आठवण येत आहे, ज्यांनी एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) भाऊ म्हणून भावपूर्ण आवाहन केले होते. करीमाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात ती पीएम मोदींना (PM Modi Rakhi) रक्षाबंधनाचा संदेश देत आहे. ती आता आमच्यात नसली तरी. बलुचिस्तान (Balochistan) चळवळीचा मोठा चेहरा असलेल्या करीमाचा मृतदेह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅनडामध्ये (Canada) सापडला होता.

ती सोशल मीडियासह इतर प्लॅटफॉर्मवर बलुचिस्तानचे मुद्दे मांडायची. करीमा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती. तिने 2016 मध्ये भारताला मदतीची विनंतीही केली होती आणि ही विनंती रक्षाबंधनाच्या सणादिवशी केली होती. त्यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ संदेश (Karima Baloch Message to PM Modi) शेअर करून भावनिक आवाहन केले. त्या संदेशाच्या शेवटी, करीमाने गुजरातीमध्ये काही ओळी देखील सांगितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती की, 'नरेंद्र मोदी जी, रक्षाबंधनाच्या दिवशी, बलुचिस्तानची एक बहीण तुम्हाला तिचा भाऊ मानून तुम्हाला काही सांगू इच्छिते. माझे नाव करीमा बलोच आहे आणि मी बलुचिस्तान विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे.

पाकिस्तानी सैन्य अत्याचार करत आहे

ते म्हणाले होते, 'बलुचिस्तानमध्ये अनेक बलुच नागरिक बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या अनेक नागरिक ठार झाले. कदाचित ते सर्व परत कधीच येणार नाहीत, त्यातील अनेकांची वाट कधीच संपणार नाही. पण या दिवसाचा हवाला देऊन आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बलुचिस्तानच्या (Balochistan Situation) बहिणी तुम्हाला भाऊ मानतात. बलुच नरसंहार, युद्ध गुन्हे आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात तुम्ही आंतरराष्ट्रीय मंचांवर बलुच आणि बहिणींचा आवाज व्हाल. आम्ही आमचे युद्ध लढू, तुम्ही फक्त आमचा आवाज व्हा.

आतापर्यंत हजारो लोक बेपत्ता आहेत

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात लोकांवर अत्याचार करत आहे. काही लोकांनी करीमाच्या मृत्यूमागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगितले होते. 2006 पासून येथे सुमारे 4000 लोक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी बहुतेक विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ते आहेत. पाकिस्तान इथल्या लोकांवर अत्याचार करतो आणि या भागाचा अजिबात विकास करत नाही. त्याला पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत (Balochistan Freedom Fight) म्हणतात. येथील लोक आजही स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. ही मागणी दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआय अत्यंत क्रूर गुन्हे करण्यासही मागे हटत नाहीत. बलोच लोकांनी अनेक वेळा भारताकडे सहकार्यही मागितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

SCROLL FOR NEXT