अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून तालिबानने आपली सत्ता स्थापनेस सुरुवात केली. त्यातच आता तालिबानने शनिवारी जाहीर केले की, जगातील सर्व देशांशी, विशेषत: अमेरिकेबरोबर (America) राजनैतिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे आहेत. वृत्तसंस्था एएनआयने चीनच्या न्यूज वेबसाईट शिन्हुआच्या हवाल्याने म्हटले आहे की, एका ट्विटरवरील पोस्टमध्ये तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदारने म्हटले, 'अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात सर्व देशांशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध निर्माण करु इच्छिते, विशेषत: अमेरिकेबरोबर.
बरदार यांनी अमेरिकेबरोबर राजनैतिक आणि व्यापारी संबंध निर्माण करण्याचा तालिबानचा (Taliban in Afghanistan) कोणताही हेतू नसल्याचे सर्व मीडिया रिपोर्ट्स नाकारले. बरदार म्हणाले, “आम्ही कधीही कोणत्याही देशाशी संबंध संपवण्याविषयी बोललो नाही. या बातमीशी संबंधित अफवा फक्त प्रचार आहे. हे खरे नाही. '' तालिबानचे वरिष्ठ नेते बरदार सध्या काबुल, अफगाणिस्तानमध्ये आहेत. जिथे ते नवीन सरकार स्थापन करण्यासाठी अफगाणिस्तानच्या राजकारणी नेत्यांशी औपचारिक चर्चा करणार आहेत.
नेते जेव्हा काबूलला पोहोचतील तेव्हा चर्चा
या गटाच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी एका स्थानिक न्यूज वेबसाईटने म्हटले होते की हिज्ब-ए-इस्लामी अफगाणिस्तान (HIA) चे नेते गुलबुद्दीन हेकमतयार यांनी माहिती दिली की तालिबान आणि अफगाणिस्तानच्या नेत्यांमध्ये औपचारिक चर्चा तेव्हाच सुरू होईल जेव्हा तालिबान नेते काबूलला पोहोचतील. (Talibani Government in Afghanistan) तालिबान सध्या जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की, त्याने 20 वर्षांनंतर अल-कायदा सारख्या दहशतवादी संघटनांशी आपले संबंध संपवले आहेत.
दहशतवादी संघटनांशी संबंधित नावे
अल-कायदा आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) या दहशतवादी संघटनांशी तालिबानचे नाव नेहमीच जोडले गेले आहे. वर्ल्ड ट्रेड टॉवरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानला सत्तेतून बेदखल केले (9/11 Attack in US). तथापि, या वर्षी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तालिबानने पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.