Ayman Al Zawahiri Dainik Gomantak
ग्लोबल

कोण होता Ayman Al Zawahiri? सर्जन ते मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, वाचा सविस्तर

Ayman al Zawahiri Killed: अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याची वयाच्या 71 व्या वर्षी अमेरिकेने हत्या केली.

दैनिक गोमन्तक

Ayman al Zawahiri Killed: अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याची वयाच्या 71 व्या वर्षी अमेरिकेने हत्या केली. ओसामा बिन लादेनला मारल्याच्या 11 वर्षानंतर जवाहिरी मारला गेला. अमेरिकेने त्याच्यावर 25 दशलक्ष डॉलर्सचा इनामही ठेवला होता.

दरम्यान, आयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला. अरबी आणि फ्रेंच भाषा बोलणारा जवाहिरी पेशाने सर्जन होता, वयाच्या 14 व्या वर्षी तो मुस्लिम ब्रदरहूडचा सदस्य झाला. 1978 मध्ये, त्याने कैरो विद्यापीठातील तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी अजा नोवारीशी विवाह केला.

दुसरीकडे, जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) स्थापन केला. या संघटनेने 1970 च्या दशकात इजिप्तमधील (Egypt) धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध केला होता. इजिप्तमध्ये इस्लामी राजवट प्रस्थापित व्हावी ही त्याची मागणी होती. 1981 मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांच्या हत्येनंतर जवाहिरीला अटक करुन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. इजिप्तमध्ये तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, तो सौदी अरेबियाला (Saudi Arabia) पळून गेला आणि वैद्यकीय विभागात प्रॅक्टिस करु लागला.

तसेच, अल-जवाहिरीने 1985 मध्ये अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियामध्ये भेट घेतली होती. इथून दोन दहशतवाद्यांच (Terrorists) घनिष्ठ नातं तयार होऊ लागलं. यानंतर, 2001 मध्ये अल-जवाहिरीने ईआयजेचे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले आणि दोघांनी जगाला हादरा देण्याचा कट रचला.

शिवाय, अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला होता. जगभरात अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे, अमेरिकेने आरोप केला होता की, 11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण केले. यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ आणि साऊथ टॉवर्सला धडकली. या हल्ल्यात 93 देशांतील 2977 लोकांचा मृत्यू झाला होता. अल कायदा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात ओसामा बिन लादेनला अल-जवाहरीने मदत केली होती.

अलीकडेच, अल-जवाहिरी 71 वर्षांचा झाला होता. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारल्यानंतर 11 वर्षांनी अमेरिकेने ओसामाप्रमाणेच जवाहिरीलाही ठार मारले आहे. त्याचबरोबर, 7 ऑगस्ट 1998 रोजी, नैरोबी, केनिया आणि आफ्रिकेतील टांझानियामधील दार एस सलाम येथे यूएस दूतावासांसमोर जवळपास एकाच वेळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 12 अमेरिकन लोकांसह 224 लोक ठार झाले आणि 4,500 हून अधिक जखमी झाले होते. या स्फोटामागे जवाहिरी होता. दार एस सलाम, टांझानिया आणि नैरोबी, केनिया येथील युनायटेड स्टेट्स दूतावासांवर 7 ऑगस्ट 1998 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये त्याच्या कथित भूमिकेसाठी अल जवाहिरीला 1998 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

तसेच, मे 2003 मध्ये, रियाधमध्ये एकाच वेळी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात नऊ अमेरिकन लोकांसह 23 लोक मारले गेले. काही दिवसांनी एक टेप प्रसिद्ध झाली, ज्यात जवाहिरीचा आवाज होता. जवाहिरीचा ठावठिकाणा बराच काळ गूढ राहिला होता. 2020 च्या उत्तरार्धापासून अल-जवाहिरीचा आजारी असल्याने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरत होत्या. यूएन अ‍ॅनालिटिकल सपोर्ट अँड सॅन्क्शन्स मॉनिटरिंग टीमच्या अलीकडील अहवालाने पुष्टी केली की, जवाहिरी अफगाणिस्तानमध्ये राहत होता आणि मुक्तपणे संवाद साधत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT