Khalistani Terrorist Arshdeep Dalla Dainik Gomantak
ग्लोबल

Khalistani Terrorist Arshdeep Dalla: कोण आहे 27 वर्षीय खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डाला? NIA च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये नाव

Manish Jadhav

Khalistani Terrorist Arshdeep Dalla: एनआयएसह दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट असलेला खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डालाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री दिल्लीतील मयूर विहार येथून अर्शदीप डालाच्या 2 शूटर्संना अटक केली आहे. हे शूटर्स दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा प्लॅन आखत होते. चला तर जाणून घेऊया खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डालाबद्दल...

कोण आहे अर्शदीप डाला?

दरम्यान, अर्शदीप डाला हा UAPA कायदा 1967 अंतर्गत कॅनडास्थित खलिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी आहे. दिल्ली पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीला जहांगीरपुरी इथे छापे टाकताना डालाचे लष्कर-ए-तैयबाशी संबंध आणि पंजाबमधील हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याच्या त्याच्या प्लॅनचा पर्दाफाश केला होता. डालाचा जन्म 1996 मध्ये लुधियाना इथे झाला. 27 वर्षीय डाला हा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील डाला गावचा रहिवासी आहे. सध्या तो कॅनडामध्ये राहत आहे. अर्शदीपचे दहशतवादी हरदीप सिंग निज्जरशी जवळचे संबंध होते. तो त्याच्या वतीने दहशतवादी कारवाया करायचा.

भारत-कॅनडा तणावाच्या काळात प्रसिद्धीझोतात आला

हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यूवरुन भारत आणि कॅनडादरम्यान वाढलेल्या तणावादरम्यान खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डाला प्रसिद्धीच्या झोतात आला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2020 च्या आसपास पंजाबमध्ये झालेल्या टार्गेट किलिंगमध्ये डालाचे पाकिस्तान कनेक्शन पहिल्यांदा समोर आले होते. त्याने RDX, IEDs, AK-47 आणि इतर शस्त्रे आणि दारुगोळा यासह हार्डवेअरचा पुरवठाही दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधून दहशतवादी मॉड्यूलला केला होता.

दोन डझनहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी

दुसरीकडे, डाला हा दोन डझनहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. त्याच्यावर खुनापासून गुन्हेगारी कट रचणे, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि ड्रग्ज अशा विविध गुन्ह्यांचा आरोप आहे. एवढेच नाही तर मोगा येथील सनशाइन क्लॉथ्स स्टोअरच्या मालकाची हत्या करण्यासाठी डाला आणि निज्जर यांनी केटीएफ मॉड्यूल स्थापन केले होते. 2022 मध्ये, डाला आणि निज्जर पुन्हा एकत्र आले आणि चार सदस्यीय KTF मॉड्यूल तयार केले, ज्यावर ग्रेनेड हल्ले केल्याचा आरोप होता. त्याने एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ल्याची योजना आखली होती. डालाने पिस्तूल आणि मॅगझिन वितरीत करण्यासाठी बिक्रम ब्रार आणि गोल्डी ब्रार यांच्यासोबत आणखी एक केटीएफ मॉड्यूल तयार केले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मनोहर लाल यांच्या हत्येत डालाचा सहभाग असल्याचे समोर आले होते. डाला जुलै 2020 मध्ये भारतातून पळून गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT