Deepak Boxer Dainik Gomantak
ग्लोबल

Deepak Boxer Arrested: कोण आहे दीपक पहल 'द बॉक्सर'? ज्याला मेक्सिकोमधून केली अटक, FBI च्या मदतीने...

Gangster Deepak Pahal Arrested: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गॅंगस्टर दीपक बॉक्सरला सातासमुद्रापार अटक करुन दिल्लीत आणले आहे.

Manish Jadhav

Delhi Police Arrested Deepak Boxer In Mexico: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गॅंगस्टर दीपक बॉक्सरला सातासमुद्रापार अटक करुन दिल्लीत आणले आहे.

दिल्ली पोलिसांच्या या यशात केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे या कुख्यात आणि फरारी गुन्हेगाराला पकडणे शक्य झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकच्या अटकेची संपूर्ण कारवाई अमेरिकन गुप्तचर संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) च्या मदतीने पार पडली. 'बॉक्सर'ला घेऊन दिल्लीला पोहोचलेले विमान आज पहाटे 4.40 वाजता दिल्लीत उतरले आहे.

कोण आहे दीपक बॉक्सर?

दीपक बॉक्सर दिल्ली पोलिसांच्या मोस्ट वॉण्टेड लीस्टमध्ये टॉपवर होता. दिल्लीतील सिव्हिल लाइन्समधील एका बिल्डरच्या हत्येसह अनेक गुन्ह्यांमध्ये तो फरार होता.

दीपक बॉक्सर या दिवसांत कुख्यात गोगी गॅंगचे नेतृत्व करत होता. गॅगस्टर गोगीच्या हत्येनंतर त्याने गॅंगचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली होती.

त्याने पुढे जाऊन लॉरेन्स बिश्नोई गॅंगबरोबर हातमिळवणी केली. दीपक बॉक्सरला परदेशात नेण्यात लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गॅंगने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी दीपक बॉक्सरवर 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काही काळापूर्वी दीपक लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या मदतीने परदेशात पळून गेल्याची बातमी आली होती. वृत्तानुसार, दीपकने बाहेर राहून गॅंगचे काम पाहावे, अशी बिश्नोईची इच्छा होती.

संपूर्ण गॅंग पोलिसांच्या रडारवर होती

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दीपक बॉक्सर बनावट पासपोर्टच्या मदतीने परदेशात पळून गेला. त्यामुळे त्याची माहिती गोळा करण्यात आली.

दरम्यान, रवी अंतिलच्या नावाने बनवलेल्या बनावट पासपोर्टच्या मदतीने बॉक्सर फरार झाल्याची माहिती मिळाली.

यानंतर, सुमारे एक आठवडा, बॉक्सरच्या नातेवाईकांसह त्याचे सर्व जुने सहकारी, साथीदार आणि गुन्हेगार सहकारी यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यामध्यमातून तो मेक्सिकोत असल्याचे समजले.

मेक्सिको आणि अमेरिकन एजन्सींचे सहकार्य घेतले

त्याला पकडण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून मेक्सिको आणि अमेरिकन एजन्सींचे सहकार्य घेतले. तो कॅनकुन शहरात सापडला.

मेक्सिकोचा (Mexico) हा भाग मानवी तस्करांचा अड्डा आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारासाठी कुप्रसिद्ध आहे. बॉक्सर इथून अमेरिकेत पळून जाणार होता. जिथून त्याला भारतात आणणे सोपे नाही. त्यामुळेच मेक्सिको पोलीस आणि एफबीआयच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT