Who Is Argentina New President Javier Milei Dainik Gomantak
ग्लोबल

Argentina New President: 'बलात्कारानंतरही अबॉर्शन करणे पाप,' जाणून घ्या कोण आहेत अर्जेंटीनाचे नवे राष्ट्रपती

Who Is Argentina New President Javier Milei: अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे नेते जेवियर मिलई यांना 55.8 टक्के मते मिळाली.

Manish Jadhav

Who Is Argentina New President Javier Milei: अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे नेते जेवियर मिलई यांना 55.8 टक्के मते मिळाली. यासह ते अर्जेंटिनाचे पुढील राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी सर्जियो मासा यांना 44.2 मते मिळाली आहेत.

जेवियर हे अर्जेंटिना पक्ष ला लिबर्टॅड अवान्झा या पक्षाचे नेते आहेत. आर्थिक संकटाने ग्रासलेल्या अर्जेंटिनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणतील, असे आश्वासन त्यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दिले आहे. यासोबतच मिलई यांनी राजकीय सुधारणा करण्याचेही आश्वासन दिले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक

दरम्यान, सर्जियो मासा पेरोनिस्ट चळवळीच्या वतीने निवडणूक लढवत होते. गेल्या 16 वर्षांपासून त्यांचा पक्ष देशावर राज्य करत होता. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मासा यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, अर्जेंटिनाच्या (Argentina) लोकांनी दुसरा मार्ग निवडला आहे.

लवकरच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे मसा यांनी सांगितले. सर्जियो हे उजव्या विचारसरणीचे नेते असून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक मानले जातात. विजयानंतर मिलई म्हणाले की, आजपासून अर्जेंटिनाच्या पुनर्बांधणीला सुरुवात होणार आहे. अर्जेंटिनासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे.

डिसेंबरमध्ये शपथ घेणार

नवीन राष्ट्रपती जेवियर मिलई यांचा जन्म 1970 मध्ये ब्यूनस आयर्समध्ये झाला होता. त्यांनी बेल्ग्रानो विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली, त्यानंतर अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापन केले होते.

मिलई यांनी राजकारणावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. निवडणूक (Election) प्रचारादरम्यान मिलई यांनी केंद्रीय बँक रद्द करण्याचे आणि आर्थिक संरचनेत बदल करण्याचे आश्वासन दिले होते.

याशिवाय, मिलई यांनी देशातून गरिबी हटवण्याचे आणि देशाची प्रतिष्ठा बहाल करण्याचे आश्वासनही दिले होते. 10 डिसेंबर 2023 रोजी मिलई अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील.

गर्भपात चुकीचा समजा

मिलई गर्भपाताचे तीव्र विरोधक आहे. बलात्काराच्या घटनांमध्येही ते गर्भपात चुकीचे मानतात. त्यांच्या निवडणूक प्रचारात त्यांनी गर्भपात कायदेशीर करणार्‍या 2020 च्या कायद्यावर सार्वमत घेण्याबाबत बोलले होते. याशिवाय, मिलई लैंगिक शिक्षणावर कठोर टीका करत आहेत. त्यांनी ब्रेनवॉशिंगचे एक साधन असे वर्णन केले आहे आणि म्हटले आहे की, लैंगिक शिक्षण मानवी अवयवांच्या तस्करीला प्रोत्साहन देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT