Mobile 
ग्लोबल

स्पेनचा कौतुकास्पद निर्णय! पॉर्न पाहण्यावर येणार निर्बंध, जाणून घ्या सरकारच्या नव्या अ‍ॅपबाबत सर्वकाही

Spain's porn passport App: अल्पवयीन मुलांमध्ये अडल्ट कंटेट पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यानंतर स्पेन सरकारच्या वतीने वापरावर नुर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Pramod Yadav

अल्पवयीन मुलांना ऑनलाईन पॉर्नचा पाहता येऊ नये यासाठी स्पेन सरकार मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. अल्पवयीन मुलांमध्ये पॉर्न पाहण्याची सवय वाढल्याचे डेल उना उल्टा या पॉर्न विरोधी ग्रुपच्या अभ्यासातून समोर आले आहे. सरकारने पॉर्न पासपोर्ट हे अ‍ॅप्लिकेशन डिझाईन केले आहे.

पॉर्न पासपोर्ट अ‍ॅप्लिकेशन काय आहे?

स्पेन सरकारच्या नव्या धोरणानुसार मोठ्या प्रमाणावर पॉर्न पाहणाऱ्या ऑनलाईन युझर्सना या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून अलर्ट येतील. या अलर्टच्या माध्यमातून त्यांना पासपोर्ट रिन्यू करावा लागेल. हे अ‍ॅप्लिकेशन डिजिटल वॉलेटचाच एक भाग आहे.

अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून युझरची प्रायव्हसी आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह कंटेटच्या अ‍ॅक्सेसवर निर्बंध घालता येणार आहे.

अ‍ॅप्लिकेशन कसे काम करेल?

मोबाईल वॉलेट पद्धतीनेच हे अ‍ॅप्लिकेशन काम करेल. यामाध्यमातून युझरचे सरकारी ओळख पत्राच्या माध्यमातून वय तपासले जाईल. युझरला अडल्ट कंटेट अ‍ॅक्सेस करण्यासाठी महिन्याला तीस क्रेडीट दिले जातील. प्रत्येक क्रेडिटसाठी एक क्यूआर कोड जनरेट होईल, ज्याचा दहावेळा वापर करता येईल.

टोकन वापरमागील उद्देश

टोकन वापरमागील मुख्य उद्देश युझरला सतत ओळख पटवण्याची गरज भासू नये असा आहे. यामध्यमातून अतिपॉर्न पाहणाऱ्या लोकांना पुन्हा तपासणी करण्याची गरज भासू शकते आणि त्यामुळे सरकार देखील त्यांच्यावर लक्ष ठेवू शकेल. याशिवाय या डेटाच्या मदतीने संबधितांना अलर्ट पाठवले जातात. महत्वाची बाब म्हणजे हे टोकन सरकरी डिजिटल विभागाच्या सचिवांमार्फत दिले जाणार आहेत.

नवे धोरण कसे फायदेशीर ठरणार?

स्पेन सरकारच्या नव्या धोरणानुसार राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेच्या माध्यमातून देशी आणि परदेशी पॉर्न संकेतस्थळांची य़ादी तयार करता येईल आणि युझरला ब्राऊसरवरती वयाचा पुरावा द्यावा लागेल. सरकारसाठी यासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची देखील मदत घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT