Goat  Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Dashain: नेपाळच्या राजदेवी मंदिरात 15,000 बकऱ्यांचा बळी, दशैन उत्सव नक्की काय आहे?

सणाचा आठवा आणि नववा दिवस अष्टमी आणि नवमी म्हणून साजरे केले जातात

गोमन्तक डिजिटल टीम

Nepal Dashain: नेपाळमधील जनकपूर शहरात असलेल्या राजदेवी मंदिरात दशैन उत्सवाच्या आठव्या आणि नवव्या दिवशी नेपाळ आणि भारतातील हजारो लोकांनी 15 हजारांहून अधिक बकऱ्यांचा बळी दिला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एका स्थानिक वृत्तपत्राला ही माहिती दिली.

दशैन हा 10 दिवसांचा उत्सव आहे जो संपूर्ण नेपाळमध्ये दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो आणि विजय दशमी हा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. सणाचा आठवा आणि नववा दिवस अष्टमी आणि नवमी म्हणून साजरे केले जातात आणि दोन्ही दिवस समान मानले जातात.

दोन्ही दिवशी लोक प्राण्यांचा बळी देतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रथांवर बंदी असल्याने, मोठ्या संख्येने भारतीय हिंदू उत्सवादरम्यान नेपाळ मधील मंदिरांमध्ये बलिदान देण्यासाठी जातात.

"सणादरम्यान रविवारी आणि सोमवारी अष्टमी आणि नवमीला देवीच्या मंदिरात एकूण 15,251 बकऱ्यांचा बळी देण्यात आला," असे गुठी संस्थानचे माहिती अधिकारी जनक पोखरेल यांनी वृत्तपत्राला दिली. पोखरेल संपूर्ण नेपाळमधील मंदिरांचे व्यवस्थापन करतात.

बळी दिलेल्या बकऱ्यांपैकी 50 टक्के बकऱ्या भारतीय भाविकांनी आणल्या होत्या. पोखरेल यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या माहितीनुसार, 'ही एक प्राचीन परंपरा आहे आणि बलिदानासाठी आणलेल्या बकऱ्यांपैकी 50 टक्के बकऱ्या भारतीय भाविक आपल्यासोबत आणतात.'

रविवारी रात्री 08 वाजता बकऱ्यांचा बळी देण्यास सुरुवात झाली, ती सोमवारी पहाटे 04 वाजेपर्यंत सुरू होती, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT