काय आहे नेमका RSV विषाणू Dainik Gomantak
ग्लोबल

काय आहे नेमका RSV विषाणू? जो मुलांसाठी धोकादायक मानला जातोय

आरएसव्हीची (RSV) रूग्णसंख्या जून महिन्यामध्ये हळूहळू वाढली, आणि मागील महिन्यात खूप जास्त वेगाने वाढली.

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: कोरोनाने (Covid-19) जगभर थैमान घातले असतांना पुन्हा एका नव्या व्हायरसने आरोग्ययंत्रणेच्या चिंतेत भर घातली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अमेरिकेत (America) एका नवीन 'डिजास्टर रेस्पिरेटरी नस्लीय' नामक वायरसने (RSV) डोके वर काढले आहे. या व्हायरसचे संक्रमण 2 आठवड्याच्या बाळापासून ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना होण्याची जास्त शक्यता आहेत. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या डेल्टा प्रकारांच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता लहान मुलांबद्दल आरोग्य तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. (What exactly is RSV virus Which considered dangerous for children)

न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, आरएसव्हीची रूग्णसंख्या जून महिन्यामध्ये हळूहळू वाढली, आणि मागील महिन्यात खूप जास्त वेगाने वाढली.

आरएसव्हीची लक्षणे

नाक वाहणे, खोकला, शिंका येणे आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. "मागील महिन्यापासून , नवजात, मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांना रुग्णालयात दाखल केले जात आहे," ह्युस्टनमधील टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील बालरोगतज्ञ डॉ. हीदर हक म्हणाले की ही संख्या प्रत्येक दिवसाला वाढत आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांत नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 148 टक्के वाढ झाली आहे. मात्र रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत 73 टक्क्याने वाढ झाली आहे. वेगाने वाढणाऱ्या संक्रमणाचा आलेख डेल्टा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर, अनेक राज्यांमधील कमकुवत लसीकरणाचे प्रमाणही वाढत्या रूग्णसंख्येला कारणीभूत ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT