Israel Hamas Fight Update 13 October: इस्रायलच्या सुरक्षा दलांना (आयडीएफ) दहशतवादी संघटना हमासचा बीमोड करण्यात मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी इस्रायली लष्कराने गाझावर केलेल्या कारवाईचे व्हिडिओ फुटेज जारी केले.
तेथून त्यांनी गाझापट्टी सीमेजवळ असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि आपल्या डझनभर ओलिसांची सुखरुप सुटका केली.
आयडीएफच्या देखरेखीखाली ऑपरेशन्स करणार्या स्पेशल शायता फ्लीट युनिटने सुफा चेकपॉईंटवर केलेल्या हल्ल्यात 60 हमास दहशतवाद्यांना ठार मारले.
दरम्यान, या कारवाईचा व्हिडिओ X या सोशल मीडिया साइटवर शेअर करण्यात आला आहे. या ऑपरेशनची माहिती देताना IDF म्हणाले की, 'आमच्या शूर जवानांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केले आणि हे यश मिळवले. या वेळी आमचे लक्ष किबुत्झ बारी, मिट्झवाह सोफा, केफर गाझा, साद, मेफालसिम आणि नीर ओझ भागावर होते.'
या मोहिमेदरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे आणि तिथे ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्याच्या उद्देशाने, दलाच्या विशेष तुकडीने या भागात आक्रमक कारवाई सुरु केली आणि थेट दहशतवाद्यांवर कारवाई केली.
ऑपरेशनची माहिती देताना आयडीएफने एका पोस्टमध्ये लिहिले की, आमच्या सैनिकांनी मोठे यश मिळवले आहे.
त्यामुळे डझनहून अधिक सैनिकांच्या या तुकडीने त्यांचे लक्ष्य कसे ओळखण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल. ओलिसांना ठेवण्यात आलेल्या इमारतींच्या आत इस्रायली दलाचे जवान जाताना दिसले.
दरम्यान, हे सैनिक हमासच्या (Hamas) दहशतवादी चौकीवर गोळीबार आणि ग्रेनेड फेकताना दिसत आहेत. इस्रायली सैनिक बंकरच्या आत जावून ओलिसांना खात्री देतात की ते त्यांचे प्राण वाचवण्यासाठी येथे आले आहेत.
ऑपरेशनदरम्यान, 13 व्या फ्लीटच्या सैनिकांनी 60 हून अधिक हमास दहशतवाद्यांना (Terrorists) ठार केले आणि 250 ओलिसांची सुरक्षितपणे सुटका केली. "हमासच्या दक्षिणेकडील नौदल ब्रिगेडचा उप कमांडर मुहम्मद अबू अली याच्यासह सव्वीस दहशतवाद्यांना त्यांच्या ठिकाणांहून बाहेर काढण्यात आले. आता सर्व दहशतवादी आमच्या ताब्यात आहेत, असे आयडीएफने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.