Pakistan PM Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

IMF पुढे पाकिस्तान नतमस्तक? PM शाहबाज शरीफ यांनी केली 'ही' मोठी घोषणा

Pakistan Economic Crisis: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानला लवकरच दिलासा देणारी बातमी मिळू शकते.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानला लवकरच दिलासा देणारी बातमी मिळू शकते.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या 1.1 अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी अत्यंत कठीण अटी मान्य केल्या आहेत.

आता त्यांच्याशी करार होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. शरीफ पुढे म्हणाले की, आमची आर्थिक टीम आणि इतर राष्ट्रीय संस्थांनी या दिशेने संयुक्त प्रयत्न केले आहेत.

जिओ न्यूजशी बोलताना शरीफ म्हणाले की, "आयएमएफच्या (IMF) अटी मान्य केल्या आहेत." अर्थमंत्री इशाक दार यांनीही अशीच विधाने केली आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था प्रचंड तणावाखाली आहे. IMF कडून 1.1 अब्ज डॉलरच्या हप्त्याची देश आतुरतेने वाट पाहत आहे. हा IMF च्या $ 6.5 बिलियन मदत पॅकेजचा एक भाग आहे, ज्याला 2019 मध्ये नाणेनिधीने मान्यता दिली होती.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही रक्कम पाकिस्तानसाठी (Pakistan) अत्यंत महत्त्वाची आहे. शरीफ म्हणाले की, 'कर्जाचा रखडलेला हप्ता पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तान आयएमएफच्या अटींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे.' अशा परिस्थितीत आधीच त्रस्त असलेल्या जनतेवरील भार आणखी वाढू शकतो. यासाठी पाकिस्तानने कर वाढवणे, ऊर्जेच्या किमती वाढवणे, व्याजदर वाढवणे असे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्जन्‍यराजा कोपला! पावसाच्या कहरामुळे शेतकरी अस्वस्थ; भाताची कणसे आडवी, कापणी यंत्र नसल्याने वाढल्या समस्या

Narakasur: नरकासूर जळाला, तरी गोवावासीयांना देतोय त्रास; अपघातांचा धोकाही वाढला

पोर्तुगीज फुटबॉलपटूसोबत सेल्फीचा मोह भोवला, केरळच्या फॅनला गोव्यात तुरुंगात काढावी लागली रात्र; FC Goa ला होऊ शकतो 8 लाखांचा दंड

Narkasur: श्रीकृष्णाऐवजी 'नरकासुराचाच' उदो उदो का होतोय?

Prashanti Talpankar: गोव्याच्या 'प्रशांती'ची भरारी! IFFSA टोरंटो येथे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, Video

SCROLL FOR NEXT