United Nations General Assembly: रशिया-युक्रेन युद्धाला आता 9 महिने होऊन गेले आहेत. हे युद्ध थांबविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यातच आता संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एक प्रस्ताव पास केला आहे. त्यानुसार रशियाने या युद्धाबद्दल युक्रेनला नुकसान भरपाई द्यावी, असे म्हटले आहे. या प्रस्तावावर मतदानही झाले आहे. भारताने मात्र या मतदानात भाग घेतला नाही. तथापि, 94 देशांनी या मतदानात भाग घेत हा प्रस्ताव मंजुर केला आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई युक्रेनला मिळायला हवी. रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला आहे. अमेरिका आणि अमेरिकेच्या सहयोगी राष्ट्रांनी हा प्रस्ताव आणला होता. 94 देशांनी या प्रस्तावाच्या बाजुने मतदान केले तर बेलारूस, चीन, क्यूबा, उत्तर कोरिया, इराण, रशिया आणि सीरिया अशा 14 देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भारतासरह भुतान, ब्राझिल, इजिप्त, इंडोनेशिया, इस्त्रायल, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका अशा 73 देशांनी या मतदानात भाग घेतला नाही, हे देश तटस्थ राहिले.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रातील या मतदानाने सर्व काही ठिक होईल का? याचा विचार केला पाहिजे. ही युद्धाची वेळ नाही. भारत रणनीती आणि मुत्सद्देगिरीद्वारे युद्ध थांबविण्याच्या विचाराच्या बाजुने आहे. युक्रेनमधील स्थितीने भारत चिंतेत आहे. अनेक लोकांचा जीव गेला आहे. महिला, बुजुर्ग, बालके बेघर झाली आहेत. त्यांना शेजारी राष्ट्रांत राहावे लागत आहे. जगातील आर्थिक मंदीला देखील युद्धच कारणीभूत आहे.
50 देशांची रशियावर टीका
महासभेत जवळपास 50 देशांनी रशियाने युक्रेनवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचे म्हटले आहे. त्यासाठी रशियाला जबाबदार धरून रशियाने त्या बदल्यात युक्रेनला नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे या राष्ट्रांनी म्हटले आहे. दरम्यान, या पुर्वीही महासभेत असा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तथापि, त्याचा फारसा प्रभाव पडलेला दिसलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.