Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: रंगीबेरंगी सूर्य! लोक म्हणाले पृथ्वीवर काहीतरी मोठे घडण्याची शक्यता?

स्वीडनमधील एका बर्फाच्छादित टेकडीभोवती सूर्याचे अनोखे नजारे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. निसर्गातील काही घटना कॅमेऱ्यात कैद होतात आणि नंतर प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. लोकांना देखील असे व्हिडिओ खूप आवडतात. असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वीडनमधील एका बर्फाच्छादित टेकडीभोवती सूर्याचे अनोखे नजारे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये सूर्य खूपच तेजस्वी दिसत आहे. सूर्याची किरणे विखुरल्याली दिसत आहेत, ज्यामुळे सूर्य अधिक आकर्षक झाला आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तो शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंटही करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ स्वीडनचा आहे. अनेक लोक डोंगराजवळ उपस्थित राहून या मनमोहक दृश्याचा आनंद घेत आहेत.

सोशल मीडियावर TheFigen_ नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत 16 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 73 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स व्हायरल होताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT