Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Elephant Cute Video: हत्ती त्याच्या बौद्धिक क्षमता, सामाजिक भान आणि भावनिक स्वभावासाठी ओळखला जातो.

Manish Jadhav

Elephant Cute Video: हत्ती त्याच्या बौद्धिक क्षमता, सामाजिक भान आणि भावनिक स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्यातील हीच वैशिष्ट्ये त्याला मानवाशी अनोखे नाते निर्माण करण्यास मदत करतात. माणूस आणि हत्ती यांच्यातील अशाच एका गोड आणि प्रेमळ नात्याची साक्ष देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला वापरकर्त्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

आधी 'हा' व्हिडिओ पाहा!

दरम्यान, हा व्हिडिओ 'सेव्ह एलिफंट फाउंडेशन' (Save Elephant Foundation) च्या संस्थापक लेक चॅलर्ट यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बसून गाणे गात असल्याचे दिसत आहे, तर एक हत्तीण (तिचे नाव फा माई) प्रेमाने आपली सोंड तिच्याभोवती गुंडाळते. यानंतर, ती हळूवारपणे आपला एक पाय तिच्या मांडीवर ठेवते, जणू काही ती तिची कृतज्ञता व्यक्त करत आहे. हे दृश्य इतके मनमोहक आणि भावनिक आहे की, ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते.

हत्तीणीच्या केअरटेकरने व्यक्त केल्या भावना

हत्तीणीची काळजी घेणाऱ्या महिलेने (Women) तिच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये या प्रसंगाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले की, “मी जेव्हा जेव्हा फा माईसाठी गाते, तेव्हा ती तिचे पाय माझ्या मांडीवर ठेवून कृतज्ञता व्यक्त करते. यावेळी मी हे विसरुन जाते की तिचे पाय खूप जड आहेत! त्या क्षणी तिचे कोमल हृदय हत्तीच्या वजनालाही हलके वाटायला लावते.”

ती पुढे म्हणते, “माणसांप्रमाणेच हत्तींमध्येही प्रेमळ भावना असते. प्रेम, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची त्याची क्षमता खरोखरच विलक्षण आहे. आपण हत्तींबद्दल जितके जाणून घेऊ तितकेच आपण त्याच्यावर प्रेम करु लागतो आणि त्याची प्रशंसा करु लागतो.”

हत्ती त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि मजबूत सामाजिक बंधासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आणि त्यांच्या काळजी घेणाऱ्या माणसांचा आवाज आणि स्पर्श सहज ओळखू शकतात. या व्हिडिओमध्ये फा माईने व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रेम हे त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे दाखवते की, केवळ प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टींवर हत्ती आणि माणसांमध्ये एक अतूट नाते निर्माण होऊ शकते.

यूजर्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या व्हिडिओने त्यांचे मन कसे जिंकले हे सांगितले. आतापर्यंत या व्हिडिओला 4 लाख 27 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

  • एका यूजरने लिहिले, “गेल्या आठवड्यात मी पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे, ज्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले.”

  • दुसऱ्या एका यूजरने म्हटले, “ज्या प्रकारे हत्ती तिला मिठी मारतो, त्यावरुन तिच्यावर किती प्रेम आणि विश्वास आहे, हे दिसते. हे दृश्य खरोखरच हृदयस्पर्शी आहे.”

  • एका अन्य यूजरने लिहिले, “एवढ्या विशालकाय प्राण्यामध्ये इतकी कोमलता पाहणे अविश्वसनीय आहे.”

अनेक वापरकर्त्यांनी भावनिक होऊनही प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिले की, “मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहणे थांबवू शकत नाही, हे प्रेम त्याच्या शुद्ध स्वरुपात दिसते.” दुसऱ्याने लिहिले, “याच कारणामुळे हत्ती इतके खास आहेत. त्यांचे हृदय आपल्या कल्पनेपेक्षाही मोठे असते.”

दरम्या, हा व्हिडिओ केवळ एका विशिष्ट घटनेचे दर्शन घडवत नाही, तर तो माणूस आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्व आणि प्रेमाचे प्रतीक आहे. हे आपल्याला आठवण करुन देतो की, प्रेम आणि आपुलकीने आपण कोणत्याही जीवाशी एक मजबूत नाते निर्माण करु शकतो आणि या महान प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT