Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Prank Video Dangerous Stunt: सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये मित्रांनी केलेली एक धोकादायक मस्करी दिसून येत आहे.

Manish Jadhav

Prank Video Dangerous Stunt: सोशल मीडिया हे व्हायरल कंटेंटचे एक व्यासपीठ बनले आहे, जिथे दररोज हजारो पोस्ट्स केल्या जातात आणि त्यापैकी काही क्षणार्धात व्हायरल होतात. कधी जुगाडचा व्हिडिओ, कधी भांडणाचा, तर कधी रील्ससाठी केलेले स्टंट मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये मित्रांनी केलेली एक धोकादायक मस्करी दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘मैत्रीत मस्करी ठीक आहे, पण सुरक्षा सर्वात महत्त्वाची’ असा विचार प्रत्येकाच्या मनात येत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) काही मित्र नदीकिनारी फिरण्यासाठी गेले आहेत. ते एका दोरीच्या साहाय्याने नदी पार करण्याची ॲक्टिव्हिटी करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, काही जण नदी पार करुन पलीकडे पोहोचले आहेत, तर एक मित्र नदीच्या मध्यभागी आहे. तो दोरीच्या मदतीने पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, पलीकडे उभे असलेले त्याचे मित्र दोरीला जोरदार झटका देत हलवू लागतात. यामुळे तो मित्र कधी पाण्यात बुडतो, तर कधी पुन्हा वर येतो. मित्रांनी केलेली ही मस्करी पाहून तो खूप घाबरलेला दिसतो, पण त्याला काहीच करता येत नाही.

हा व्हिडिओ पाहताना जरी गंमत वाटत असली, तरी अशा प्रकारची मस्करी खूप धोकादायक ठरु शकते. पाण्याच्या प्रवाहात तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची किंवा डोक्याला मार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ एक्स (X) या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर @RealTofanOjha नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “जीवनात असे मित्र मोठ्या पुण्याईने मिळतात, काळजी घ्या,” असे उपरोधिक कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 64 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

व्हिडिओ पाहून अनेक यूजर्संनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, “हे देवा, या मित्राला कोणीतरी मारुन टाका!” तर दुसऱ्याने लिहिले, “मैत्रीमध्ये काहीही शक्य आहे, पण सुरक्षा सर्वात आधी.” तर आणखी एका यूजरने लिहिले, “अशा प्रकारची मस्करी करणे मित्रांचे काम नाही, हे खूप धोकादायक आहे.” याउलट, काही यूजर्संना ही गंमत खूप आवडली असून, त्यांनी “ही तर कमालीची मैत्री आहे,” असे लिहिले.

या व्हायरल व्हिडिओमधून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. मित्र-मैत्रिणींमध्ये मस्करी आणि गंमत चालते, पण ती जीवावर बेतणारी नसावी. एक क्षणभर केलेली मजा कधीकधी खूप महागात पडू शकते. सुरक्षिततेची काळजी घेणे नेहमीच महत्त्वाचे असते, मग ते कोणत्याही परिस्थितीत असो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'चायनामन'ची जादुई गोलंदाजी! UAE विरुद्ध एकाच षटकात घेतल्या 3 विकेट्स, पण हॅटट्रिक हुकली VIDEO

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

SCROLL FOR NEXT